मुंबईमध्ये 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 9 उमेदवारांनी मागे घेतले अर्ज; या आहेत प्रमुख लढती

अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहरात चार उमेदवारांनी, तर उपनगरात पाच उमेदवारांनी असे 9 अर्ज मागे घेतले आहेत. आता मुंबई मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मुंबई: सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) साठी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहरात चार उमेदवारांनी, तर उपनगरात पाच उमेदवारांनी असे 9 अर्ज मागे घेतले आहेत. आता मुंबई मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. महाराष्ट्रातील चार टप्प्यांपैकी गुरुवारी विदर्भात पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांत मतदान झाले. मुंबईत चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात उत्तर मध्य मुंबईत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा असे वारसदार रिंगणात आहेत.

मुंबईमधील उमेदवार -

> मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ- 18

> उत्तर पश्‍चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघ- 21

> उत्तर पूर्व (ईशान्य)- 27

> उत्तर मध्य- 20

> दक्षिण मध्य-17

> दक्षिण मुंबई मतदारसंघ- 13

(हेही वाचा: पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक)

मुंबईच्या प्रमुख लढती

1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना) व मिलिंद देवरा (कॉग्रेस)

2. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना) व एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस)

3. उत्तर मध्य मुंबई – पुनम महाजन (भाजप) व प्रिया दत्त (कॉंग्रेस)

4. उत्तर पश्‍चिम – गजानन किर्तीकर (शिवसेना) व संजय निरूपम (कॉंग्रेस)

5. उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप) व उर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस)

6. ईशान्य मुंबई – मनोज कोटक (भाजप) व संजय पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

अर्ज मागे घेतलेले उमेदवार - राकेश विश्वनाथ अरोरा, ज्योती सुरेश शेट्टी, राजेंद्र वामन वाघमारे, मुइनुद्दीन यार मोहम्मद खान, वारिस अली नसीर अहमद फारुकी, अब्बू देकेंद्र (आरुमुगम एम. देवेंद्र), उत्तमचंद राजमल जैन, मो. नईम शेख

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement