'पासपोर्ट आपल्या दारी' योजने अंतर्गत महाराष्ट्रात 11 नवी पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू

महाराष्ट्रात 11 नवी पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू

(Image: PTI/Representational)

सरकारी काम आणि सहा महिने थांब .. हा अनुभव अनेकांना अनेक ठिकाणी आला असेल. आजकाल बजेटमध्ये अनेक परदेश दौरे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे पासपोर्ट काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. शहरात काही ठराविक ठिकाणीच पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. मात्र आता ही समस्या दूर करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी योजना सुरू केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून नवी सेवा केंद्र

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जानेवारी 2017 देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत 218 केंद्र सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात 11 नवी पासपोर्ट केंद्र

महाराष्ट्रात सध्या 25 पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. यामध्ये आता 11 नव्या पासपोर्ट केंद्राची भर पडणार आहे. 'पासपोर्ट आपल्या दारी' या योजनेच्या चौथ्या टप्प्यांतर्गत 11 नवी पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या केंद्राची भर पडल्यानंतर आता महाराष्ट्रभरातील एकूण संख्या 36 झाली आहे.

कुठे सुरू होणार नवी पासपोर्ट केंद्र ?

भंडारा, भिवंडी, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रामटेक, रावेर या शहरात नवी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा (Video)

Pod Car System In Mira-Bhayandar: लवकरच मीरा-भाईंदरमध्ये सुरु होऊ शकते ड्रायव्हरलेस 'पॉड कार' सेवा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik प्रयत्नशील

Dance Bars In Mumbai: मुंबईमध्ये पुन्हा सुरु होऊ शकतात डान्स बार; महाराष्ट्र सरकार करणार कायद्यात सुधारणा, येत्या अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता

Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू

Share Now