चंद्रपूरात आठवड्याभरात 100 डुकरांचा मृत्यू, मृत पावलेल्या जनावरांमागचे गूढ कायम

महापालिका प्रशासन यामागचे कारण शोधून काढत आहे. आठवड्याभरात 100 डुकरांच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चंद्रपूरात आठवड्याभरात 100 डुकरांचा मृत्यू, मृत पावलेल्या जनावरांमागचे गूढ कायम
Pig (Photo Credits: PixaBay)

चंद्रपूरात (Chandrapur) मागील आठवड्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्याभरात चंद्रपूर जिल्ह्यात 100 डुकरांचा मृत्यू (Pig) झाला आहे. ही संख्या विचार करायला लावणारी असून या मृत्यूमागचे कारण समोर आलेले नाही. चंद्रपूर महानगरपालिकेच्या तीन झोनमध्ये मृत पावलेली डुकरे उचलण्यासाठी आलेल्या तक्रारीच्या आधारावर ही माहिती मिळालेली आहे. महापालिका प्रशासन यामागचे कारण शोधून काढत आहे. आठवड्याभरात 100 डुकरांच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुकर मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. अचानक मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे देशमुख यांनी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. या घटनेमुळे स्वाईन फ्लूचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Global Pandemic निर्माण करण्याची क्षमता असलेला Swine Flu चा नवा प्रकार चीन मध्ये संशोधनात आला समोर, वाचा सविस्तर

डुकर मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुकरांमध्ये साथीचा आजार असणे अशी कारणे यामागे असू शकतात. डुकरांमध्ये साथीचा आजार पसरणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक होऊ शकते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता डुकरांचे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूच्या कारणांची तज्ञ पशुवैद्यकीय वैद्यकीय चिकित्सक यांचेकडून शहानिशा करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते व उपायुक्त विशाल वाघ यांना पत्र देऊन केलेली आहे.

मागील वर्षी डुकरांच्या मृत्यूची नेमकी संख्या सांगता येणार नाही, मात्र आठवडाभरात डुकरांचे मृत्यू झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कारणांचा शोध घेण्यासाठी डुकराचा मृतदेह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” असं चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्त विशाल वाघ यांनी सांगितलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2021 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).