तृतीयपंथींयांचे शाप आणि आशीर्वाद लागतात का? जाणून घ्या या मागची कारणे

जाणून घेऊया त्या मागची कारणे

transgender (Photo Credits: Files Photo)

आपल्या घरात काही शुभकार्य असेल असेल ब-याचदा तृतीयपंथींयांना(Transgender) बोलावून त्यांना नाचवले जातात. त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्या शुभकार्यात कोणते अशुभ घडू नये, सर्व चांगले व्हावे, त्या कुटूंबाची भरभराट व्हावी ही त्यामागची श्रद्धा असते. मात्र अनेकदा आपण एखाद्या तृतीयपंथास पैसे देण्यास नकार दिल्यास ते आपल्याला शाप देतात असे ही अनेकदा पाहायला मिळते. मात्र त्यांचे हे शाप किंवा वरदान मनुष्यास खरंच लागतात का या बाबत आपल्या मनात अजून ब-याच शंका-कुशंका आहेत. तसे पाहायला गेले तर, तृतीयपंथींयांचे अस्तित्व अगदी पौराणिक काळापासून आहे. त्यामुळे आजही बरेच लोकं त्यांना खूप मानतात. मात्र त्यांनी दिलेले आशीर्वाद किंवा शाप यांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व असले पाहिजे, यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत.

पौराणिक कथेनुसार, जेव्हा प्रभू श्री राम वनवासासाठी अयोध्या सोडून चालले होते, तेव्हा अनेक अयोध्यावासीही त्यांच्या मागे मागे येऊ लागले, ज्यात तृतीयपंथींयांचा देखील समावेश होता. श्री रामांनी सर्वांना मागे जाण्यास सांगितले. त्यावेळ सर्वजण निघून गेले मात्र तृतीयपंथी निघून गेले नाही. प्रभू रामचंद्रांनी अनेकदा सांगूनही ते तिथून निघून गेले नाही. त्यांच्या या निस्सीम भक्तीवर खूश होऊन प्रभू रामचंद्रांनी त्यांना आशीर्वाद दिला की, तृतीयपंथींयांनी कोणालाही दिलेला आशीर्वाद फलित होईल. तेव्हा पासून कोणाचा जन्म, लग्न अथवा नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तृतीयपंथींयांना बोलावले जाते. तसेच कोणत्याही शुभकार्यात त्यांचा आशीर्वाद खूप लाभदायक मानला जातो. त्यामुळे अंधश्रद्धा म्हणून नाही, मात्र सहसा कोणी दारात आलेल्या तृतीयपंथींयांचा अपमान करु नये. तसेच त्यांना खाली हात न जाऊ देता काही हातावर काही तरी दान करावे. त्यांचा आशीर्वाद लाभणे जितके चांगले तितकेच त्यांचे शापही लागू शकतात हा विचार डोळ्यासमोर समोर आलेल्या तृतीयपंथींयांचा अपमान देखील करु नका.

असे म्हटले जाते की, जर कोणत्या बुधवारी तुम्ही कोणत्या तृतीयपंथींयांना काही पैसे दिलात तर त्या बदल्यात त्याच्याकडून एखादा रुपया परत घेऊन तुमच्या पर्समध्ये ठेवा. मात्र हे लक्षात ठेवा की हा रुपया तुम्ही दिलेल्या पैशांमधला असला नाही पाहिजे. तो रुपया जो पर्यंत तुमच्या पर्समध्ये असेल तोपर्यंत तुमच्याकडील पैशात काही कमतरता भासणार नाही.

International Women's Day 2019: पाच भारतीय ट्रान्सजेंडर महिला ज्यांनी प्रवाहातील महिलांपेक्षाही केली दमदार कामगिरी

हे जरी भाकडकथा असली किंवा लोकांचे विचार असले तरी आजच्या काळात पैसे कमावण्याच्या उद्देशाने अनेक पुरुषच स्त्रिया बनून थोडक्यात तृतीयपंथींयांचा वेश परिधान करुन भीक मागतात. त्यामुळे अनेक जण त्यांना पिटाळून लावतात. त्यामुळे त्यांचा अनादर न करता त्यांना काहीतरी दानधर्म करावा असेच इथे सांगता येईल.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.