Vat Purnima Special Ukhane: वडाच्या पूजेनंतर होणारा नाव घेण्याचा अट्टाहास पूर्ण करण्यसाठी सुवासिनींसाठी वटपौर्णिमा विशेष उखाणे
मग तुमची आयत्या वेळेस होणारी पंचाईत टाळण्यासाठी आम्ही काही खास उखाणे
Vat Purnima Marathi Ukhane: महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी ते पौर्णिमा असं तीन दिवसांचं वटसावित्रीचं व्रत (Vatsavitri Vrat) करण्याची प्रथा आहे. यंदा 5 जून म्हणजे वटपौर्णिमेदिवशी (Vat Purnima) या व्रताची सांगता होणार आहे. सुवासिनी स्त्रिया सौभाग्य, सुख, शांती साठी तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी करतात. प्रामुख्याने नववधूंमध्ये या सणाबद्दल खास उत्सुकता असते. वडाच्या झाडाची पूजा करून, पतीच्या सुदृढ आयुष्यासाठी उपवास केल्यानंतर नातेवाईक आणि सख्यांच्या सोबत अनेकींना हमखास उखाणे घेण्याचा हट्ट केला जातो. यंदा तुम्ही पहिल्यांदा वटपौर्णिमेचा सण साजरा करणार असाल तर तुम्हांला वटपौर्णिमेच्या निमित्ताने उखाणे घेण्यासाठी गोड अट्टाहास नक्की होणार. मग तुमची आयत्या वेळेस होणारी पंचाईत टाळण्यासाठी आम्ही काही खास उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यंदा पूजेच्या पूर्वी किंवा नातेवाईक, मैत्रिणींच्या गराड्यात जाण्यापूर्वी यापैकी एक दोन उखाणे नक्की पाठ करून जा! Vat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे.
वटपौर्णिमा विशेष उखाणे
1. वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
2. पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
...रावांचं नाव घेते ...ची सून
3.भरजरी साडीला जरीचा खण
... रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण
4. दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा
वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते ... रावांच्या नावाचा हिरवा चुडा
5. वडाची पूजा आज मनोभावे करते
... रावांसाठी दीर्घायुष्य मागते
Vat Purnima Ukhane: वट सावित्री च्या दिवशी होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे - Watch Video
हिंदू पौराणिक कथेनुसार, सवित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला होता. त्यावेळेस सावित्रीच्या कठोर तपश्चर्येनंतर सत्यवानांना पुन्हा प्राण मिळाले. अशी अख्यायिका आहे. या संकेताला अनुसरूनच महिला वटपौर्णिमेदिवशी जवळच्या वटवृक्षा जवळ जाऊन त्याची विधीवत पूजा करतात. सुताच्या धाग्याने सात फेर्या मारतात. आणि पुढील 7 जन्म हाच पती म्हणून मिळावा म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करतात.