भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका
तसेच त्यांना परमोच्च सुखाच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासही वेळ लागतो. परंतु सेक्स करताना पुरुषाकडून याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.
वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी, सुरळीत चालण्यासाठी सेक्स (Sex) किती महत्वाचा आहे हे आपण जाणतोच. मात्र शारीरिक संबंधावेळी आपण खरच संतुष्ट होतो का ? महिलांची सेक्सची इच्छा ही नेहमीच पुरूषांपेक्षा दुप्पट असल्याचे बोलले जाते. तसेच त्यांना परमोच्च सुखाच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासही वेळ लागतो. परंतु सेक्स करताना पुरुषाकडून याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच पुरुषांपेक्षा स्त्रिया या सेक्समध्ये जास्त असंतुष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी सर्वात आधी आपल्या पार्टनरसोबत बोला, आपण नक्की कुठे कमी पडतो ते जाणून घ्या. तरी काही फायदा झाला नाही तर स्त्रिया सेक्समध्ये असंतुष्ट राहण्याची ही कारणे वाचा, कदाचित काही फायदा होऊ शकतो.
अती घाई – सेक्ससाठी पुरुष नेहमीच उत्सुक असतो. काही पुरुष आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी ‘त्या’ गोष्टीची घाई करतात, आणि इथेच चूक घडते. लक्षात घ्या स्त्रियांना ‘त्या’ गोष्टीपेक्षाही इतर काही हवे असते. किस, फोरप्ले, संभाषण अशा गोष्टींनी हळू हळू सुरुवात करा. यामुळेच महिला उत्तेजित होऊन परमोच्च सुखापर्यंत पोहचू शकतात.
योग्य लुब्रिकेशन – सेक्सदरम्यान लुब्रिकेशनची काय गरज? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर सेक्स दरम्यान ‘ती’ क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लुब्रिकेशन फार महत्वाचे आहे. यामुळे स्त्रियांचे जनेंद्रीय स्मूद बनते, यामुळेच स्त्रियांना सेक्सदरम्यान त्रास होता नाही.
विविध पोझिशन्स – नवीन गोष्टी ट्राय करण्याच्या नादात अनेक पोझिशनमध्ये सेक्स केला जातो. हीच गोष्ट स्त्रियांसाठी त्रासदायक ठरू शकते. स्त्रियांच्या काही आवडत्या सेक्स पोझिशन्स असतात ज्यामध्ये त्या कम्फर्टेबल असतात. त्यामुळे व्हिडिओ पाहून काही नवे करण्याऐवजी आपल्या पार्टनरशी बोलून कम्फर्टेबल असणाऱ्या पोझिशन्स शोधून काढा. तुफानी सेक्सपेक्षा योग्य पद्धतीने सेक्स करणे गरजेचे आहे.
सेक्सचे प्रमाण - ज्या महिला आठवड्यातून फक्त दोनदा सेक्स करतात त्यांचे आयुष्य चागले असते, त्या सेक्समध्येही संतुष्ट राहतात. मात्र ज्या महिला आठवड्यातून चार ते पाच वेळा सेक्स करतात. त्या संबंधात त्यांना संतुष्टी मिळत नाही. त्यामुळे पुरुषांनो आपली सेक्सची इच्छा स्त्रियांवर थोपवण्याआधी त्यांची इच्छाही विचारात घ्या. (हेही वाचा: आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद)
सेक्सदरम्यानचे मैत्रीपूर्ण संबंध – बरेच वेळा सेक्सदरम्यान मानसिक आणि शारीरिक थकवा आडवा येत असतो. अशावेळी सेक्ससाठी पार्टनरला तयार करण्यापूर्वी हा थकवा दूर करायचा प्रयत्न करा. त्यासाठी चार प्रेमाचे शब्द, मसाज, हलक्याफुलक्या गोष्टी पाहणे असे उपाय करा.
सेक्स ही गोष्ट जबरदस्तीने केली तर त्यामध्ये तुमचा पार्टनर कधीच संतुष्ट होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याऐवजी आपल्या पार्टनरकडे एक मित्र म्हणून पहा, सेक्समध्ये भावना गुंतवा, एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ज्याने तुमची सेक्सलाईफ नक्कीच चांगली होईल.