World’s Greatest Places of 2022: टाईमने जाहीर केली जगातील 'सर्वोत्तम 50 ठिकाणांची' यादी; भारतातील 'या' दोन स्थळांचा समावेश, जाणून घ्या लिस्ट
'टाइम'ने मंगळवारी सांगितले की, सध्या कोरानाच्या केसेस कमी होत आहेत, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योग पुन्हा रुळावर येत आहे. टाईमने प्रसिद्ध केलेली ठिकाणे इतर पर्यटन स्थळांपेक्षा वेगळी आहेत आणि ती लोकांना काहीतरी नवीन, रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देतात.
टाईम मॅगझिनने 2022 सालासाठी ‘जगातील सर्वोत्तम 50 ठिकाणां’ची (World’s Greatest Places of 2022) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील अहमदाबाद (Ahmedabad) आणि केरळ (kerala) या जागांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणांची 'भेट देण्यासाठी 50 विलक्षण ठिकाणे' म्हणून निवड करण्यात आली आहे. 'टाइम'ने मंगळवारी सांगितले की, सध्या कोरानाच्या केसेस कमी होत आहेत, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योग पुन्हा रुळावर येत आहे. टाईमने प्रसिद्ध केलेली ठिकाणे इतर पर्यटन स्थळांपेक्षा वेगळी आहेत आणि ती लोकांना काहीतरी नवीन, रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देतात.
या यादीमधील सर्वाधिक 13 युरोपमधील, तर 10 उत्तर अमेरिका विभागातील आहेत. भारतामधील ठिकाणांबाबत टाईमने म्हटले आहे, ‘अहमदाबाद, भारतातील पहिले युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा शहर, जिथे प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या नवकल्पना आहेत, ज्यामुळे ते सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे. या शहरातील साबरमती नदीच्या काठावर 36 एकरात वसलेला गांधी आश्रम म्हणजे शांत वातावरणासह एक आनंदी विहार आहे. या ठिकाणी 9 दिवस जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव साजरा केला जातो.’
टाईमच्या यादीत असलेले देशातील अजून एक ठिकाण म्हणजे, नैऋत्य किनार्यावरील केरळ. मासिकाने म्हटले आहे, ‘हे देशातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. केरळचे सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार 'बॅकवॉटर', मंदिरे आणि राजवाडे यांनी त्याच्या सौंदर्यात आणखीनच वाढ केली आहे.’ (हेही वाचा: Space Hotel: जगातील पहिले अंतराळ हॉटेल; एकावेळी 28 लोक राहू शकणार, 2025 मध्ये होणार सुरु)
या यादीमध्ये पुढील काही ठिकाणांचा समावेश आहे-
Africa-
Nairobi, Kenya
Hwange National Park, Zimbabwe
Franschhoek, South Africa
Asia-
Ras Al Khaimah, UAE
Seoul, South Korea
Doha, Qatar
Kerala, India
Ahmedabad, India
Australia-
Great Barrier Reef, Australia
Fremantle, Australia
Europe-
Dolni Morava, Czech Republic
València, Spain
Portree, Scotland
North America-
Detroit, Michigan
Tofino, British Columbia
Riviera Nayarit, Mexico
South America-
Bogotá, Colombia
São Paulo, Brazil
Salta, Argentina
तुम्ही या ठिकाणी ही पूर्ण यादी पाहू शकता.
दरम्यान, ही यादी प्रसिद्ध करत टाईमने म्हटले आहे की, ‘2022 मध्ये जीवनातील आव्हाने जितकी अवघड असतील, तितकीच आशा आहे की प्रवासाद्वारे मानावांमधील नाते अधिक दृढ होईल. जगभरातील बहुतांश लोकसंख्येचे कोविड-19 विरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे लोक पुन्हा प्रवासासाठी बाहेर पडत आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग पुन्हा बहरत असून, प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी तो सज्ज आहे.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)