Snake Boiga Thackerayi: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे याने शोधली सापाची नवी प्रजाती; पाहा फोटो
या वेळी ते अनेक प्राणी आणि घाटातील जीवांचा शोध घेतात. त्यांचे निरीक्षण करतात. या आधी तेजस ठाकरे यांनी खेकड्यांची एक दुर्मिळ प्रजातही शोधली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एका सापाचा फोटो असून, ही सापाची नवी प्रजाती असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे सापाच्या या प्रजातीला बोईगा ठाकरे (Snake Boiga Thackerayi) असे नाव देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, सापाच्या या प्रजातीचे नाव त्यांचा भाऊ तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नावावरुन देण्यात आले आहे. या सापाच्या प्रजातीचा शोध घेण्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमचे मोठे योगदान राहिल्याचेही आदित्य यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'आमचे बंधू तेजस ठाकरे यांनी पश्चिम सह्याद्री घाटामधून सापाची ही प्रजात शोधली आहे'. या सापाचे नाव तेजसच्या नावावरुनच ठेवल्याचेही आदित्य यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या नव्या दोन प्रजाती शोधून काढल्या होत्या. या पाली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आढळलात. या पालींच्या प्रजातीचा शोध तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर यांनी लावला होता. सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यात सापडलेल्या पालीच्या प्रजातीला 'निमस्पिस कोयनाएन्सिस' आणि आंबाघाटात सापडलेल्या प्रजातीला 'निमस्पिस आंबा', असे संबोधण्या आले होते. (हेही वाचा, व्हिडिओ: उडणारा साप दाखवून 'तो' करायचा उदरनिर्वाह; भुवनेश्वर वन विभागाने केली कारवाई)
आदित्य ठाकरे ट्विट
तेजस ठाकरे आणि त्यांची टीम पावसाळा ऋतू सुरु झाला की, पश्चिम घाटात अनेकदा संशोधनासाठी जातात. या वेळी ते अनेक प्राणी आणि घाटातील जीवांचा शोध घेतात. त्यांचे निरीक्षण करतात. या आधी तेजस ठाकरे यांनी खेकड्यांची एक दुर्मिळ प्रजातही शोधली होती.