Tejas Thackeray यांचे नवे संशोधन, मुंबईत आढळली 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती, नाव ठेवले 'Rakthamichtys Mumba'

मुंबईतील विहीरींमध्ये 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती तेजस ठाकरे यांना आढळून आली आहे. ही प्रजाती अंध (Blind Eel) असल्याचेही आढळून आले असून 'रक्थमिच्थिस मुंबा' (Rakthamichtys Mumba) असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे.

Tejas Thackeray Discovered Rakthamichtys Mumba (Photo Credit : Instagraam)

तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आणखी एका नव्या जीवाची प्रजाती शोधून काढली आहे. मुंबईतील विहीरींमध्ये 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती तेजस ठाकरे यांना आढळून आली आहे. ही प्रजाती अंध (Blind Eel) असल्याचेही आढळून आले असून 'रक्थमिच्थिस मुंबा' (Rakthamichtys Mumba) असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. तेजस ठाकरे (Tejas Thackeray) ​हे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे चिरंजीव तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे बंधू आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे कुटुंबीयाला मोठे महत्त्व आहे. तेजस ठाकरे वन्यजीव संशोधनात गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हेसुद्धा छायाचित्रकार आहेत.

मुंबईतून शोधलेल्या 'ईल' माशाच्या नव्या रक्तवर्णीय प्रजातीबद्दल तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. तेजस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रजाती ईल माशाची असून ती गोड्या पाण्यात राहते. तसेच हिचा संबध रक्थमिच्थिस जीनशीअसल्याचे तेजस यांनी म्हटले आहे. हा मासा `hypogean freshwater eel' प्रजातींपैकी आहे. या प्रजातीचा शोधो लावण्याचे श्रेय तेजस ठाकरे, प्रवीणराज, अनिल मोहापात्रा आणि अनम पवन कुमार यांना देण्यात आले आहे.

तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे की, आजवर आम्ही घेतलेल्या सर्व प्रजातींपैकी हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. ब्लाईंड हायपोजीशन फ्रेश वॉटर ईल तीही मुंबईमध्ये. हिचे नाव रक्थमिच्थिस मुंबा असे ठेवण्यात आले आहे. जे मुंबई शहरांवरुन ठेवण्यात आले आहे. तेजस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी आम्ही या नव्या प्रजाती संग्रहित केल्या होत्या. यावर आम्ही कोरोना काळात काम केले. तसेच, संशोधन केल्यावर आम्ही ती जगासमोर आणली. (हेही वाचा, Tejas Thackeray Discovers New Snakehead Species: तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, मेघालय East Khasi Hills येथे शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकडेड)

इन्स्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejas Thackeray (@tuthackeray)

गोड्या पाण्यात राहणारी अंध माशाची आढळून आलेली ही पहिली प्रजाती आहे. जी पश्चिम मुंबईत आढळून आली आहे. या माशासंदर्भातील एक निबंध 'Aqua International Journal of Ichthyology' मध्येही छापण्यात आला आहे. तेजस यांनी म्हटले आहे की, या माशाच्या प्रजातीचे नाव मुंबई शहर आणि मुंबा देवीवरुन ठेवण्यात आले आहे