International Picnic Day 2019: यंदाच्या पावसाळयात निसर्गाच्या कुशीत नेणाऱ्या 'या' पाच सोप्प्या ट्रेक ना आवर्जून भेट द्या
यंदाच्या पावसाळ्यात तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा एकट्याने ट्रेक ला जायचा विचार करत असला तर मुंबई व पुण्याच्या जवळील या पाच ठिकाणांचा नदीची विचार करा.
पावसाळा सुरु होताच अनेकांना भटकंतीचे वेध लागतात, पावसाच्या सरींनंतर हिरवागार झालेला डोंगर, मातीचा गंध या भटक्या मंडळींना खुणावत असतो . खरतर पावसाळा आणि पिकनिक हे समीकरण मागील काही वर्षात आणखी घट्ट होताना पाहायला मिळालं आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या डोंगरदऱ्या या तरुणांना अधिक आकर्षित करत आहेत. मात्र अनेकदा काही मंडळींना तब्येतीनुसार किंवा आपल्या व्यस्थ रुटीन मुळॆ लांब पल्ल्याचे मोठे कठीण ट्रेक करणे शक्य होत नाही. पण काळजी करू नका, यंदा पावसाळयात तुमच्या ग्रुप सोबत किंवा एकट्यानेच फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर, मुंबई व पुण्याच्या जवळील या पाच सोप्प्या ट्रेक्सच्या पर्यायांचा तुम्ही नक्की विचार करू शकता..
माथेरान ट्रेक
माथेरान आणि पावसाळी पिकनिक यासारखा दुसरा योग नाही असे म्हणतात ते काही खोटं नाही. ट्रेकर्स मंडळींना या एकाच ठिकाणहून अन्य अनेक ट्रेकशी जोडणारे मार्ग उपलब्ध आहेत.नेरळ स्थानकातून तुम्ही गाडीने किंवा बसने माथेरानच्या बेस कॅम्प पर्यंत पोहचू शकता इथून पुढे गेल्यावर गार्बेट ट्रेक, पॅनोरमा पॉईंट, चार्लोट तलाव, पेब किल्ला, कलावंतीण गड असे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला लांब ट्रेकला जाणं जमणार नसेल तरी तुम्ही माथेरानच्या आसपास सूर्यास्त व सूर्योदय सोडल्यासही अन्य २८ पॉइंट्सची सफर करू शकता.
कर्नाळा ट्रेक
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध व सोप्पा ट्रेक म्हणजे कर्नाळा.कर्नाळा किल्ला हा अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या खालचे पक्षी अभयारण्य हे येथील आणखीन एक आकर्षण आहे. किल्ल्याचा माथा हा तुलनेने लहान आहे.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भवानी मातेचे मंदिर व समोर एक मोठा वाडा आहे, या वाड्याच्या जवळच डोंगराचा एक सुळका आहे. काहीतरी थ्रिलिंग करायचा विचार करत असाल तर तुम्ही या सुळक्याच्या चढाईचा पर्याय निवडू शकता मात्र यासाठी योग्य ते मार्गदर्शन व प्रशिक्षण असणे आवश्यक आहे, शिवाय पावसाळ्यात हा पर्याय काहीसा धोक्याचा ठरू शकतो. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.
कोरीगड/ कोराईगड ट्रेक
पुण्यातील मुळशी धरणाच्या जवळच असलेल्या कोरी जमातीचा गद अशी या ट्रेकची ओळख आहे. अखंड तटबंदी केलला हा किल्ला लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर आहे. कोरीगडला जाण्यासाठी लोणवल्यावरून बसचा पर्याय उपलब्ध आहे.बसने पेठशहापूर गावात उतरल्यावर या गावातून सरळ जाणारी पायवाट तुम्हाला गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जाईल. इथून साधारण ४५ मिनिटा चालल्यावर तुम्ही किल्ल्यावर पोहचू शकता. या वाटेत तुम्हाला दगडी गुहा, गणेश मंदिर, कोराई देवी मंदिर अशी खाणे पाहता येतील. पूर्ण गड पाहाण्यासाठी एक तास लागतो. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, असा सर्व परिसर दिसतो.
लोहगड ट्रेक
लोणावळा डोंगर रांगेत असणारा लोहगड ट्रेक म्हणजे नवख्या मंडळींसाठी सर्वात सोप्पा पर्याय आहे. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच वर्दळ असते. याच डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या तसेच विंचू काटा हा बघन्यासातरखा पॉईंट आहे. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून तुम्ही किल्ल्याकडे जाऊ शककिल्ल्याच्या ता. मळवली वरून किल्ल्याच्या बेसपर्यंत जाताना वाटेत मोठे धबधबे व नागमोडी वळणे आहेत, पावसाळयात हा परिसर आणखीनच निसर्गरम्य होतो.
विसापूर ट्रेक
लोहगड ट्रेक ला लागूनच विसापूर ला जाणारा मार्ग आहे. मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की,दिसणारी ही लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची रांग भटक्या मंडळींचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच समोर दिसणाऱ्या डोंगरामागे विसापूर किल्ला लपला आहे . भाजे गावात गेल्यावरच हा किल्ला नजरेस पडतो.विस्पुर किल्ल्यावरील पायर्या व पावसाळ्यत तिथून वाहणारे पाणी नव्या ट्रेकर्सचे लक्ष वेधून घेते. पायर्यांच्या बाजूने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. एरवी या गुहांमध्ये 30 ते 40 जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते.
या सर्व सोप्प्या ट्रेकिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी अलीकडे ट्रेकर्स मंडळींनी ग्रुप तयार करून जाण्याची पद्धत सुरु केली आहे. या ग्रुप सोबत गेल्यास तुम्हाला फिरण्यासोबतच किल्ल्याची माहिती देखील दिली जाते. अन्यथा तुम्ही एकट्याने देखील या ठिकाणी जाऊ शकता.