Cnemaspis Magnifica: तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर यांच्यासह चार तरुणांनी शोधली Magnificent Dwarf Gecko नामक नव्या प्रजातिची पाल

अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे सौनक पाल, इशान अगरवाल हे तरुण वाइल्ड लाइफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून संशोधन करत असतात. तर सौनक पाल हे 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेच्या माध्यमातून संशोधन करतात.

Cnemaspis Magnifica | (Photo Credits: Instagram)

अक्षय खांडेकर (Akshay Khandekar), तेजस ठाकरे (Tejas Thackeray), सौनक पाल (Saunak Pal), इशान अगरवाल (Ishan Agarwal) या चार तरुणांनी एका नव्या पालीचा शोध लावला आहे. मॅग्निफिसेंट ड्वार्फ गेको (Magnificent Dwarf Gecko) असे या पालीचे नामकरन करण्यात आले आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील सकलेशपूर (Sakleshpur) जंगल परिसरात असलेल्या उभ्या शिळांमध्ये या नव्या पालीची प्रजात आढळली आहे. भारतात आजघडीला पालींच्या 50 प्रजाती ज्ञात आहेत. मात्र, ही नवी पाल या 50 पालींहून वेगळी आहे. या प्रजातीच्या पालीचा रंग, डोळ्यांची बुबुळे, शरीररचना हे इतर 50 पालिपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे ही पाल प्राणीतज्ज्ञांमध्ये कुतुहलाचा विषय ठरला आहे.

मॅग्निफिसेंट ड्वार्फ गेको (Magnificent Dwarf Gecko) पालीवर अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे सौनक पाल, इशान अगरवाल या चार तरुणांनी केलेल्या शोधनिबंधास आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध अशा 'झुटाक्सा' नियतकालिकात प्रसिद्धी मिळाली आहे. या पालीचे लॅटिन भाषेतील नाव हे निमास्पिस मॅग्निफिका ( Cnemaspis Magnifica) असे आहे. साधारण 58 मिलीमीटर लांबीची ही पाल रात्रीच्या वेळी कार्यरत होते. इतर पाली दिवसा आणि उजेडात कार्यरत असतात. या पालीच्या नराच्या मांडीवर विशिष्ट इतर पालींच्या मांडीवर असतात तशा टोकदार खवल्यांचा अभाव आढळतो. तसेच इतर पालींच्या मांडीवर असलेल्या ग्रंथींमध्येही फरक असतो. त्यामुळे बारकाईने पाहिले तरच ही पाल ओळखता येऊ शकते.

संशोधक अक्षय खांडेकर याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, खरे तर मॅग्निफिसेंट ड्वार्फ गेको (Magnificent Dwarf Gecko) प्रजातीच्या पाली कर्नाटक राज्यातील सकलेशपूर जंगलात 2014 मध्येच सापडल्या होत्या. मात्र, भारता आढळणाऱ्या इतर 50 पालींच्या प्रजातीपैकी मॅग्निफिसेंट ड्वार्फ गेको ही पाल कशी वेगळी आहे याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळे हे आव्हान पेलत संशोधन करण्यास इतकी वर्षे (5-6 वर्षे) लागली. (हेही वाचा, Snake Boiga Thackerayi: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे याने शोधली सापाची नवी प्रजाती; पाहा फोटो)

महत्त्वाचे म्हणजे पालींच्या नमुन्यांची नोंदच उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आगोदरच अस्तित्वात असलेल्या 50 पासिंटे नमुने गोळा करणे. त्यातून ही पाल कशी वेगळी आहे हे शोधणे हे सगळेच आव्हानात्मक होते. दरम्यान, आम्ही केलेल्या संशोधनात आढळून आले की, ही पाल इतर पालींपेक्षा केवळ वेगळीच नाही. तर, या पालीची शरीररचना जनुकीय रचनाही इतर पालींपेक्षा वेगळी असल्याचे या संशोधनात आढळून आले, असेही अगरवाल याने सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे सौनक पाल, इशान अगरवाल हे तरुण वाइल्ड लाइफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून संशोधन करत असतात. तर सौनक पाल हे 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेच्या माध्यमातून संशोधन करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now