Char Dham Yatra 2024 Death Toll: चार धाम यात्रेदरम्यान आतापर्यंत 64 यात्रेकरूंचा मृत्यू, हायपोथर्मिया आणि हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांनी गमावला जीव
हायपोथर्मिया आणि हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी ५० वर्षांवरील यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
Char Dham Yatra 2024 Death Toll: चार धाम यात्रेदरम्यान मृत्यूची मालिका सुरूच आहे. अलीकडेच हेमकुंड साहिब यात्रेला आलेल्या पंजाबमधील तीन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याशिवाय बद्रीनाथ धाम(Badrinath Dham)मध्ये एका यात्रेकरूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हेमकुंड साहिबसह चारही धामांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ६४ झाली आहे. (हेही वाचा:Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 50 हून अधिक भाविकांचा मृत्यू; केदारनाथमध्ये सर्वाधिक 27 लोकांनी गमावला आपला जीव )
केदारनाथ धामच्या 17 दिवसांच्या प्रवासात 27 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. हायपोथर्मिया आणि हृदयविकाराचा झटका ही मृत्यूंची मुख्य कारणे आहेत. आधीच आरोग्याच्या समस्या असलेल्या यात्रेकरूंना केदारनाथ धाममध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.
या दिवसांत केदारनाथ धाममध्ये दररोज हलका पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे तापमान शून्य अंशावर पोहोचले आहे. दुपारनंतर दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमान खूपच कमी असून तेथे सतत थंड वारे वाहत असतात. यासोबतच अनेक यात्रेकरू शर्ट आणि उबदार कपड्यांशिवाय मंदिरात पोहोचत आहेत. पावसात भिजल्यावर प्रचंड थंडीमुळे यात्रेकरू हायपोथर्मियाचे बळी ठरत असून ते मृत्यूचेही कारण ठरत आहे.
दुसरीकडे, केदारनाथ धाममध्ये आरोग्यविषयक समस्या असलेल्या यात्रेकरूंनाही आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. साधारणपणे, जेव्हा यात्रेकरू उष्ण भागातून केदारनाथ धामला पोहोचतात तेव्हा त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे.असे असतानाही केदारनाथ धाममध्ये मोठ्या संख्येने भाविक उबदार कपड्यांशिवाय पोहोचत आहेत, जे मृत्यूचे कारण बनत आहेत. पन्नास वर्षांवरील यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे, मात्र यात्रेकरू कोणतीही तपासणी न घेता केदारनाथ धामला पोहोचत आहेत. यात्रेकरूंची संख्या जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक यात्रेकरूच्या आरोग्याची तपासणी करणे आरोग्य विभागाला शक्य होत नाही.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एचसीएस मार्तोलिया यांनी सांगितले की, केदारनाथ यात्रेदरम्यान 2008 यात्रेकरूंवर ओपीडीद्वारे उपचार करण्यात आले, ज्यात 1329 पुरुष आणि 679 महिलांचा समावेश होता. आतापर्यंत 34,655 यात्रेकरूंवर ओपीडी आणि आपत्कालीन परिस्थितीत उपचार करण्यात आलेत. यात 26,554 पुरुष आणि 8,101 महिलांचा समावेश आहे. 234 यात्रेकरूंना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली. आतापर्यंत 1983 यात्रेकरूंना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे.