रेल्वेचा नवा नियम; 20 मिनिटं आधी स्टेशनवर न पोहचल्यास गाडी चुकणार !

विमानतळासारखी सुरक्षाव्यवस्था अंमलात रेल्वे स्थानकांवरही सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

Indian Railways (Photo Credits: PTI)

विमानतळासारखी सुरक्षाव्यवस्था रेल्वे स्थानकांवरही सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या पकडणाऱ्या प्रवाशांना गाडीच्या वेळेच्या 20 मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहचावे लागणार आहे.

रेल्वे स्टेशनवरील नव्याने सुरु होणाऱ्या रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे सर्व टप्पे पार करण्यासाठी 15-20 मिनिटांचा अवधी लागणार आहे. हे सर्व टप्पे गाडी सुटणाऱ्या वेळेआधी पूर्ण न झाल्यास गाडी सुटेल.

काही दिवसातच ही नवी सुरक्षाव्यवस्था तब्बल 202 रेल्वे स्थानकांवर राबवण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. या सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या सुरक्षायंत्रणेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर सर्व बाजूंनी सुरक्षित करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी मार्ग बंद करण्याची सोय नसेल त्याठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येतील. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता शॉपिंगची सुविधा

इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम म्हणजेच ISS सुरक्षा यंत्रणा उभारण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली असून त्यात CCTV कॅमेरे, बॅग स्कॅनिंग, बॉम्ब डिटेक्टर यांचा समावेश आहे. या योजनसाठी तब्बल 385 कोटींचा खर्च येणार आहे.

कुंभमेळा असल्याने सर्वप्रथम ही सुरक्षा यंत्रणा प्रयागराज आणि कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात येणार आहे.