घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे व का? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांच्याकडून

त्यामुळे घराचा आग्नेय कोपरा हा स्वयंपाकघरासाठी राखीव असावा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघराची रचना करताना आपल्याला पुढील गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे

Kitchen (Photo Credits: PixaBay)

असं म्हणतात की जर एखाद्या महिलेला कोणाचे मन जिंकायचे असेल तर त्याचा मार्ग पोटातून असतो. म्हणजेच एखाद्याचे मन जिंकण्यासाठी त्याचा आवडीचा पदार्थ बनवून दिलात तरी तुम्ही त्या व्यक्तीचे मन जिंकाल. हा पदार्थ जेथे बनला जातो ते म्हणजे स्वयंपाकघर (Kitchen). घरातील मूळ गाभा हे त्या घराचे स्वयंपाकघर असते. तुमचे स्वयंपाक घर छान, नीटनेटकं असणं हे एका उत्तम गृहिणीचे लक्षण आहे असं म्हणतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात प्रसन्न वातावरण निर्माण करायचे असेल तर स्वयंपाक घर केवळ नीटनेटकं असून चालत नाही तर त्याचे स्थान, त्याची दिशा ही महत्त्वाची असते. त्यामुळे वास्तुची रचना करत असताना तुमचे स्वयंपाक घर आग्नेय दिशेस असले पाहिजे. आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या 45 अंशावर असलेली दिशा. स्वयंपाकघर आग्नेय दिशेस असल्यास घरात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो असे वास्तुशास्त्र सांगते. मात्र यामागचे नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही चैतन्य वास्तू चे वास्तुतज्ज्ञ विशाल डोके (Vastu Expert Vishal Doke) यांच्याशी बातचीत केली. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच

वास्तुशास्त्र विशाल डोके यांच्या म्हणण्यानुसार, आग्नेय दिशेतील स्वयंपाकघर हे अतिशय प्रभावी असते असे मानले जाते. त्यामुळे घराचा आग्नेय कोपरा हा स्वयंपाकघरासाठी राखीव असावा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघराची रचना करताना आपल्याला पुढील गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे

1. आपल्या घरचे स्वयंपाकगृह हे आग्नेय कोप-यात असावे.

2. स्वयंपाकगृहाचा ओटा पूर्वेकडील भिंतीपासून थोडा दूर पण दक्षिणेकडील भिंतीस चिकटून असावा.

3. गॅस किंवा शेगडी अशा प्रकारे ठेवावी जेणेकडून स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड हे आग्नेय दिशेकडे राहिल.

4. किचनच्या ओट्यावरील पाण्याचे सिंक हे पूर्वेकडील बाजूस असावे.

हेही वाचा- घरात शांती नांदायची असेल तर चप्पल कशा ठेवाव्यात या बाबत आहेत हे '5' समज-गैरसमज

आग्नेय दिशेस स्वयंपाकघर का असावे:

1. शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास सूर्यकिरणांमधील ताम्र किरण हे स्वयंपाकघरात येतात. यावेळी ते सूर्यकिरणाच्या 45 अंशाच्या रुपाने येतात. ही किरणं स्वयंपाकघराचे निर्जंतुकीकरण करतात. तसेच स्वयंपाकघरात बनणा-या अन्नपदार्थांचे जैविक मूल्य कायम ठेवतात. या किरणांमुळे स्त्री आरोग्य ही निरोगी राहते.

2. आग्नेय दिशेला उंची असून त्यात मंडे कट्टा असल्यास सुख,धनलाभ व संततीप्राप्ती होते

3. आग्नेय दिशेला पाया उंच असल्याने ऐश्वर्यलाभ, धनलाभ होतो.

4. आग्नेय दिशेचे दार आग्नेय प्रभाव दक्षिण क्षेत्रात असणे शुभ असते.

आग्नेयचा जिना दक्षिणेस असल्यास त्याची फळे सर्वश्रुत असतात.

5. तुमच्या घरातील फ्रिज हे स्वयंपाक घरात दक्षिणेस असावा कारण फ्रिज हे यांत्रिक उपकरण असल्याने आग्नेय दिशा ही त्याला समांतर असणारी दिशा असते.

घरातील महिला ही अधिक काळ ही स्वयंपाकगृहात घालवत असते. त्यामुळे त्या स्त्रीचे आरोग्य आणि त्या स्त्रीचे घरातील स्थान हे आग्नेय दिशा ठरवत असते. त्यामुळे जर स्वयंपाकगृह आग्नेय दिशेला असेल तर त्या स्त्रीच्या हाताला फार चव असते असे वास्तुशास्त्र सांगते. तसेच तिच्या हातून होणारी प्रत्येक पाककलाकृती उत्तमोत्तम होत असते. आपल्या घरातील महिलांचे स्वास्थ्याचे कारण हे आग्नेय दिशा म्हणजेच आग्नेय दिशेतील स्वयंपाक घर असते असे वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांचे म्हणणे आहे.