Wife Birthday Wishes In Marathi: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अर्धांगिनीसाठी बॅनर, स्टेटस अन हटके मेसेज; एका क्लिकवर

शिवाय तिला आनंदाचा सुखद धक्का देण्यासाठी एखादी-छोटीमोठी सहल, सिनेमा, नाटक आदिचे आयोजन करतो. किंवा एखादा दागिना, साडी अथवा असेच काहीतरी गिफ्ट आनतो. आम्ही इथे बायकोला 5 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, SMS, स्टेटस आदींमधून खूश करण्यासाठी काही क्लृप्त्या देत आहोत.

Husband Wife Relationship | representative pic- (photo credit -pixabay)

Happy Birthday Wife: पती-पत्नीचे नाते म्हमजे टॉम अँड जेरी (Tom and Jerry) कार्टुनसारखे. एकमेकांसोबत पटत नाही आणि एकमेकांशिवाय राहवतही नाही. असे असले तरी पती पत्नीच्या नात्यात कायमच पत्नीचा नेहमीच वरचष्मा राहिलेला दिसतो. अर्थात त्यात लडीवाळपणाच अधिक असतो. त्यामुळे पुरुषही म्हणजे पतीही सहसा पत्नीला दुखावत नाही. तिला खुश ठेवण्यासाठी तो नानाविध प्रयत्न करतो. 'बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा' देतो, छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये तिचे कौतुक करतो. शिवाय तिला आनंदाचा सुखद धक्का देण्यासाठी एखादी-छोटीमोठी सहल, सिनेमा, नाटक आदिचे आयोजन करतो. किंवा एखादा दागिना, साडी अथवा असेच काहीतरी गिफ्ट आनतो. आम्ही इथे बायकोला 5 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, SMS, स्टेटस आदींमधून खूश करण्यासाठी काही क्लृप्त्या देत आहोत.

बायकोचा वाढदिवस स्टेटस

(हेही वाचा, Uttar Pradesh: 'एका रात्रीत दोनदा Sex'; बायको म्हणाली 'नाको'; नवऱ्याने गळा दाबून केली हत्या)

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा काव्यात्मक शुभेच्छा

कधी रुसलीस तू कधी हसलीस तू

कधी आलाच राग माझा तर उपाशी झोपलीस तू

दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू

तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी खवळलेला महासागर

तू शांत किनारा आहेस

मी उमलणारे फूल

तू त्यातला सुगंध आहेस

मी एक देह तू त्यातला श्वास आहेस

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे

मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे

पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा

बायको तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

माझ्या घराला घरपण आणणारी

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रेमळ पत्नीस

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी खूप भाग्यवान आहे

कारण मला तुझ्यासारखी

कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू

सहचारिणी मिळाली

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या

कधीच जायला नको

तुझ्या डोळ्यात अश्रू

कधीच यायला नको

आनंदाचा झरा सदैव

तुझ्या आयुष्यात वाहत राहो

हीच माझी इच्छा!

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

दरम्यान, यशस्वी वैवाहिक जीवन तयार करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, समजून घेणे आणि वैयक्तिक आणि जोडपे म्हणून सतत सुधारणा करण्याची वचनबद्धता आवश्यक आहे. कधी कधी जोडप्यामध्ये मतभेद, कलह निर्माणहोऊ शकते. अशा वेळी नात्यातील ताणतणा सुधारण्यासाठी आप्तेष्ठांची विश्वासाने बोलणे. समुपदेशनाची मदत घेणे महत्त्वाचे ठरते.