मुलगा लग्नासाठी 'या' कारणांमुळेच नोकरी करणाऱ्या मुलीला पसंद करतो
त्यामुळे तरुणतरुणींमध्ये शिक्षणापासून ते लग्नासंबंधित सुद्धा काही गोष्टींचा विचार करुन निर्णय घेतला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या देशात लोकांचा मानसिकता काळानुसार दिवसेंदिवस बदलत चालली आहे. त्यामुळे तरुणतरुणींमध्ये शिक्षणापासून ते लग्नासंबंधित सुद्धा काही गोष्टींचा विचार करुन निर्णय घेतला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता लग्नासाठी घर नाही तर मुलगी किंवा मुलगा उत्तम नोकरी करतो की नाही हे प्रथम पाहिले जाते.
तसेच मुलांच्या सुद्धा लग्नाबद्दल काही अपेक्षा असतात. मुख्यत्वे मुलगा आपली होणारी बायको घरतील मंडळींसोबत त्याची सुद्धा काळजी घेणारी असायली हवी असे काहींचे म्हणणे असते. मात्र सध्या मुलाला 'या' कारणांमुळेच नोकरी करणाऱ्या मुलीला पसंद करतो.
>जर तुमची बायको नोकरी करत असेल तर तिला तुमच्या कामात येणाऱ्या समस्या कशा पद्धतीच्या असतात हे सहज समजते. तसेच ऑफिसात कामाचा व्याप जास्त असल्यास कामावरुन घरी येण्यासाठी उशिर झाल्यास ती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार नाही. त्यामुळे दोघांचे नातेसंबंध अधिक मजबूत होतात.
>आजच्या काळात एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी विवाहित जोडप्याने नोकरी करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थित तुमचा पार्टनर नोकरी करत असल्यास तुम्हाला जाणवणाऱ्या समस्यांचा व्याप कमी होईल.
>दोघेही नोकरी करत असल्यास पुढच्या भवितव्यासाठी उत्तम सेव्हिंग होऊ शकते. त्यामुळेच मुलगा नोकरी करणारी मुलगी शोधतो.
>नवऱ्याच्या गैरहजेरीत बायको तिच्या पैशातून घरातील अन्य कामे पूर्ण करु शकते. त्यामुळे ती नोकरी करत असल्यास तिला फक्त नवऱ्याच्या पैशांवर अवलंबून राहावे लागत नाही.
>एका रिसर्जच्या माध्यमातून असे समोर आले आहे की, नोकरी करणाऱ्या महिलांची विचारसरणी खुपच सकारात्मक असते. त्यांना माहिती असते की कोणत्या अडचणींना कशा पद्धतीने समोरे जायचे आहे.
(पत्नीने पतीला धोका देण्याचं प्रमाण वाढतंय, जाणून घ्या यामागील नेमकं कारण आणि काय कराल उपाय?
या सर्व कारणांमुळेच सध्या तरुणतरुणी एकमेकांना समजून घेण्यासाठी काही वेळ घेतात. तसेच आयुष्याबद्दलचा महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सध्या प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणे फार महत्वाचे असते असे म्हटले जाते. जेणेकरुन त्याचा परिणाम भवितव्यात जाणवत नाही.