नॉनव्हेज खाणाऱ्यांचा Sex Stamina तर असतो भन्नाट पण 'या' कारणामुळे सेक्स लाईफ मध्ये येतात समस्या, जाणून घ्या
एका परदेशी सर्वेक्षणातून नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सेक्स स्टेमिनाचे कौतुक करण्यात आले आहे, मात्र असं असलं तरी मांसाहाराची होणाऱ्या शारीरिक मानसिक स्वभावामुळे या व्यक्तींच्या सेक्स लाईफमध्ये अनेकदा समस्या येतात असाही उलगडा याच अहवाल करण्यात आला आहे.
सेक्स (Sex) करताना सर्वात जास्त कोणती गोष्ट पार्टनर्सचा मूड सेट करणारी असेल तर ती म्हणजे तुमचा स्टॅमिना (Sex Stamina), अलीकडेच झालेल्या एका परदेशी सर्वेक्षणातून नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सेक्स स्टेमिनाचे कौतुक करण्यात आले आहे, मात्र असं असलं तरी मांसाहाराची होणाऱ्या शारीरिक मानसिक स्वभावामुळे या व्यक्तींच्या सेक्स लाईफमध्ये अनेकदा समस्या येतात असाही उलगडा याच अहवाल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, मांसाहारी व्यक्ती या बेडवर अनेकदा स्वार्थी असतात, त्यांचा स्वभाव तामसी असल्याने त्यांची सेक्स करण्याची पद्धत ही अनेकदा हार्ड आणि रफ असते, परिणामी पार्टनरच्या एन्जॉयमेंट बद्दल या व्यक्ती फार कमी विचार करतात, ही गोष्ट भावनिक आणि मानसिक असल्याने अर्थात याला सुद्धा अपवाद असूच शकतात. Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत
हकनॉल डिस्पैच या ब्रिटन स्थित संस्थेने याबाबत सर्वेक्षण केले होते, यातून समोर आलेल्या माहितीनुसार, 57 टक्के शाकाहारी व्यक्ती या आठवड्यातून तीन ते चार वेळा पार्टनरसोबत सेक्स करतात, तर 49 टक्के मांसाहारी व्यक्ती या दोन ते तीन वेळाच सेक्सची मजा घेतात. शाकाहारी व्यक्ती या फोरप्ले पासून सेक्स ला सुरुवात करतात आणि परमोच्च क्षण गाठल्यावर सुद्धा आपल्या पार्टनर सोबत कडलींग करून जवळीक साधून राहतात, तर दुसरीकडे नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्ती थेट सेक्सला पसंती देतात. साहजिकच सेक्स ही एक प्रक्रियेसारखी अनुभवल्याने शाकाहारी व्यक्तींचा आनंद वाढतो असे सांगण्यात आले आहे तर जर का समोरचा पार्टनर आपल्या इतकाच ऍक्टिव्ह नसेल तर सेक्स करताना नॉनव्हेज खाणारी मंडळी नाराज होतात असेही समोर आले आहे .
या अहवालातील वैज्ञानिक बाब अशी की, शाकाहारी जेवणात सर्व प्रकारची सत्वे शरीराला मिळत असल्याने सेक्स स्टॅमिना सुद्धा उत्तम असतो, शाकाहारी अन्न घेताना झिंक, व्हिटॅमिन बी यांची शरीराला प्राप्ती होते, या गोष्टी शरीराची कामेच्छा वाढवण्यात कामी येतात.
(टीप: सदर लेख हा केवळ प्राप्त माहिती आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, गरज असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा)