Sex After 60: सेक्स करण्यासाठी वयाचे बंधन असते? वयाच्या साठीनंतर शरीरसंबंध ठेवावेत? काय सांगतात तज्ज्ञ
Sex कधी करावा? सेक्स कोणत्या वयात करावा? कोणासोबत करावा? सेक्स करण्यासाठी वयाचं बंधन असतं का? तो साठीनंतर करावा का? असे एक ना अनेक प्रश्न. अनेकांच्या मनात. पौगंडावस्थेतील मुलगा, मुलगी असो, तरुण-तरुणी असो अथावा चाळीशीच्या उंभरठ्यावर असलेली मंडळी किंवा वयाची साठी पार केलेले लोक असोत. सेक्स अर्थातच शरीरसंबंध ही अनेकांच्या मनातली, परस्परातील संवादातील एक मुलभूत प्रक्रिया.
Sex कधी करावा? सेक्स कोणत्या वयात करावा? कोणासोबत करावा? सेक्स करण्यासाठी वयाचं बंधन असतं का? तो साठीनंतर (Sex After 60) करावा का? असे एक ना अनेक प्रश्न. अनेकांच्या मनात. पौगंडावस्थेतील मुलगा, मुलगी असो, तरुण-तरुणी असो अथावा चाळीशीच्या उंभरठ्यावर असलेली मंडळी किंवा वयाची साठी पार केलेले लोक (Sex of Old People) असोत. सेक्स अर्थातच शरीरसंबंध (Sex and Relationships) ही अनेकांच्या मनातली, परस्परातील संवादातील एक मुलभूत प्रक्रिया. केवळ चित्रपट, जाहीराती अथवा साहित्यच नव्हे तर प्राचिन काळातील पूरातन संस्कृतीपासून ते आजवरच्या समाजव्यवस्थेपर्यंत प्रत्येकालाच सेक्स बाबत कुतूहल वाटत आले आहे. वयाच्या साठीनंतर सेक्स करावा का? याबाबतही असेच अनेकांना कुतुहल. पाहा काय सांगतात तज्ज्ञ?
हाँगकाँग येथील सेक्स थेरपिस्ट आणि रिलेशनशिप सल्लागार सिंथिया हो (Cynthia Ho) यांची साठीनंतरच्या सेक्सबाबत एका संकेतस्थळाने प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. सिंथिया हो म्हणतात, सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, जेष्ठत्व वाढल्यानंतर लोक सेक्स करत नाही, असे सर्वसाधारण म्हटले जाते. मनोरंजन, सौदर्यप्रसाधनांच्या जाहीराती आणि इतर गोष्टींमध्ये अनेकदा तरुण-तरुणी आणि सौंदर्याचे प्रतिनिधीत्व करणारे निरोगी मॉडेल्सच वापरण्याला प्राधान्य दिले जाते. या कक्षेत क्वचीतच एखादा घटक (अधिक वयाचा) अंतर्भूत असतो. त्यामुळे अनेकदा नकारात्मक परिणाम जाणवतो. अनेकांच्या मनात न्यूनगंड) प्रामुख्याने जे लौकिक अर्थाने सुंदर दिसत नाहीत किंवा अधिक वयाचे असतात) त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो की, आपण सेक्सच करु नये. परंतू, वास्तवात तसे काहीच नाही. सर्व वयोगटातील लोक सेक्स करु शकतात. हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि सहमतीचा मुद्दा आहे. (हेही वाचा: Foods That Can Improve Your Sex Life: 'या' पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे लैंगिक जीवन सुधारू शकते)
हाँग कॉंग येथे 1999 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जवळपास ज्येष्ठ वयोगटात मोडणारे दोन तृतियांश लोक सांगतात की त्यांना लैंगिक संबंध अनावश्यक वाटतात. 2004 मध्ये चीनमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यात वयाची 65 वर्षे पार केलेल्या 528 नागरिकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यापैकी 40% नागरिकांना वाटते की, वाढत्या वयात सेक्स हा अपायकारक आहे.
दरम्यान, जुलै 2021 मध्ये We Vibe नावाच्या एका कंपनीने जवळपास 17 देशांतील जीवनशैलीबाबत सर्व्हेक्षण केले. यात सुमारे 14,500 नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. यात 36% नागरिकांनी वाढत्या वयासोबत लैंगिक इच्छा कमी होते असे सांगितले.
वयाच्या साठीनंतर सेक्स करावा का?
असे असले तरी लैंगिक तज्ज्ञ सांगतात की, सेक्स करण्यासाठी वयाचे बंधन नसते. जोपर्यंत तुम्ही शारीरिक आणि मानसिक रित्या तंदुरुस्त आहात तोपर्यंत तुम्ही सेक्स करु शकता. हो, अगदी वयाच्या 60 वर्षानंतरही. सेक्स आणि तारुण्य याचा काहीच संबंध नाही. अर्थात तुमच्या हालचालींवर काही मर्यादा नक्की येऊ शकतात.
आपली शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी नेहमी व्यायाम करत राहा. अनेकदा दैनंदिन व्यग्रसतेमुळे नियमीत व्यायाम करणे शक्य होत नाही. परंतू, अशा वेळी किमान दररोज वार्मअप तरी करत राहा. ज्यामुळे तुमचे शरीर आणि मनही प्रसन्न राहिल. सेक्स हा सुद्धा विशिष्ट मर्यादेत एक प्रकारचा व्यायामच आहे. सेक्स केल्याने रक्ताभीसरण सुधारते, हृदयाची कार्यक्षमता वाढते. स्वाशोच्छवासही वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)