Palang Tod Paan: पलंगतोड पान वाढवते Sex Power? फायदा होतो पण कोणाला? घ्या जाणून

ज्याला हनीमुन पान (Honeymoon Paan) असेही म्हटले आहे. काही लोक दावाही करतात पलंगतोड पाण खाल्याने लैंगिक शक्ती (Sex Power) चांगलिच वाढते. यात तथ्य किती हे शास्त्रीय, वद्यकीय दृष्ट्या अद्याप तरी पुढे आले नाही. पण तरीही पलंगतोड पानाचा फायदो होतो. कोणाला ते घ्या जाणून

Palang Tod Paan, Honeymoon Paan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sex Power वाढविण्यासाठी लोक अगदी वेडेपीसे झालेले असतात. अनेक लोक सेक्स पॉवर वाढविण्यासाठी विविध डॉक्टर, बाबा, मांत्रिक-तांत्रिकांचाही आधार घेतात. त्यांना हे माहीत नसते की लैंगिक शक्ती ही निसर्गात: असते. त्यामुळे एखादे औषध, उपचार केला तर त्यात किती फरक पडतो हे ज्याचे त्यालाच माहिती. या सगळ्यात काही लोकांचा पलंग तोड पान (Palang Tod Paan) खाण्यावर फार भरवसा. ज्याला हनीमुन पान (Honeymoon Paan) असेही म्हटले आहे. काही लोक दावाही करतात पलंगतोड पाण खाल्याने लैंगिक शक्ती (Sex Power) चांगलिच वाढते. यात तथ्य किती हे शास्त्रीय, वद्यकीय दृष्ट्या अद्याप तरी पुढे आले नाही. पण तरीही पलंगतोड पानाचा फायदो होतो. कोणाला ते घ्या जाणून. (Who Get Benefits Of Palang Tod Paan)

पलंगतोड पान हा प्रकार काय आहे?

आपल्या देशात पान खाने ही एक सर्वसाधारण बाब आहे. घरगुती कार्यक्रमात पाहुन्यांचे स्वागत करताना, एकमेकांना पान देण्याची प्रथा, पद्धत आहे. हा पान बनवताना त्यात सुपारी, कात, चुना आणि इतर पदार्थ टाकले जातात. अनेक लोक पान खाण्याची सवय आरोग्यास हानीकारक असल्याचे सांगितले जाते. तर काही लोक पान हे शरीरातील अन्न पचविण्यासाठी महत्त्वाचे ठरते असाही दावा करतात. काही लोकांचा दावा असतो की पान हे कामोत्तेजना वाढवते. आयुर्वेदात पान जेवन झाल्यानंतर आणि सहवासापूर्वी खाल्ले जाऊ शकते. पान तोंडातील दुर्गंधी दूर करते. पनातील पदार्थ हे कामोत्तेजना वाढवतात असेही सांगितले जाते. (हेही वाचा, Betel Leaf Benefit: अनेक गुणांनी युक्त असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे )

कसे बनते पलंगतोड पान

पलंगतोड पान विक्री करणारे अनेक विक्रेते पान बनविण्याची पद्धत सांगतात. हे विक्रेते दावा करतात की पलंगतोड पान हे कामोत्तेजना वाढविण्यासाठी ओळखले जाते. या पानाला पन्नी म्हणजेच गोल्ड फॉयलमध्ये गुंडाळले जाते. त्याला जोडीत विकले जाते. पलंगतोड पान एका खास सुगंधी आणि आकर्षक डब्यात ठेवले जाते. पुरुषासाठी बनविलेल्या या पानात सुगंधी Agar (समुद्रातील वनस्पतीपासून तयार केलेला जिलेटिनसारखा पदार्थ) रस, गुलाब, कश्मीरी केसर यांसह इतर काही पदार्थ टाकून ते कलकत्ता पानात गुंडाळले जातात. ज्यामुळे त्याचा वास अत्यंत सुगंधी येतो.

खरोखरच वाढते सेक्स पॉवर? फायदा होतो पण कोणाला?

पलंगतोड पाण आणि सेक्स पॉवर वाढण्याबाबत केला जाणारा दावा याबाबत सेक्सोलॉजिस्टना विचारले असता, अनेक सेक्सोलॉजिस्ट सांगतात की, पलंगतोड पान हे प्रामुख्याने सुहागरात्री खाल्ले जाते. त्याचा उद्देश सुहागरात्री सेक्स पॉवर वाढावी, स्टॅमीना अधिक राहावा असा असतो. पण, काही पलंगतोड पानांमध्ये नशीले पदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे लोकांना पटकण गुंगी येते आणि ते निद्राधीन होतात. मात्र, पान खाल्यानंतर गुंगी येण्यादरम्यानच्या काळात संबंधितांमध्ये जो सहवास घडतो तो त्यांना प्रदीर्घ वाटतो. त्यामुंळे पलंग तोड पाण खाण्याचा फायदा होतो. पण तो सेक्स पॉवर वाढण्यासठी नव्हे तर दुकानदाराचा गल्ला भरण्यासाठी.

दरम्यान, पान खान्याचे काही फायदेही आहेत. पानात एंजाईम असते. त्यामुळे पचनशक्तीस मदत होते. पानात वापरला जाणारा काथ एक एंटिसेप्टिक मानला जातो. ज्याचा दातांच्या आजारासाठी फायदा असतो. चुन्यामध्ये कॅल्शीयम असते. त्यामुळे त्याचा फायदा शरीरातील हाडांना होऊ शकतो. तसेच गर्भवती महिलांनाही कॅल्शीयमची गरज असते. पानामुळे त्यांनाही फायदा होतो. बारीक केलेली सुपारी कफावर गुणकारी ठरु शकते. इलायची तोंडाचा स्वाद चांगला करते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. पण त्याचे प्रमाण वेगवेगळे असते.