प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: The Noun Project and File Image)

Lies Men Often Tell You About Sex! सेक्स ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे नात्यातील कडवटपणा दूर होत पार्टनर्स एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यावेळी प्रत्येक खऱ्या गोष्टींचा उलगडा केला जातो. काही जण आपल्या सेक्स लाइफ बद्दल खरी माहिती सुद्धा देण्यास उत्सुक असतात. पार्टनर सोबत त्यांना कशा पद्धतीचे सेक्स करण्यास मजा येते किंवा त्यांची फँटेसी काय आहे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे ही सध्याच्या काळात खुलेपणाने दिली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, बहुतांश पुरुष हे सेक्स बद्दल खोटं बोलतात. या मधील काही खोट्या गोष्टी अयोग्य ही नसतात. परंतु काही वेळेस पुरुष मंडळी एका पॉइंटला सेक्स बद्दल खोटं बोलतात. तर जाणून घ्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या पुरुष मंडळी सेक्स दरम्यान आपल्या महिला पार्टनर सोबत खोटं बोलतात.

आम्ही तुम्हाला पुरुष मंडळी सेक्स दरम्यान काय खोट बोलतात आणि काय नाही त्याबद्दल सांगणार आहोत. आम्ही या खोटेपणाचा खुलासा करण्यासाठी काही गोष्टींची लिस्ट घेऊन आलो आहोत. मात्र तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा की सर्व पुरुष मंडळी एकसारखी नसतात. त्यामुळे हा लेख वाचून तुम्हाला खोटेपणा आणि खरेपणातील नेमके किती अंतर आहे हे कळू शकणार आहे.(Oral Sex Tips: ओरल सेक्स करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी ज्यामुळे येणार नाही कोणतीच अडचण) 

>>ज्या पुरुष मंडळी नेहमीच बोलतात सेक्सच्या प्रत्येक वेळी कंडोमचा वापर करतो तर हे खरं नाहीय. करण वास्तविक रुपात लोक याबद्दल वारंवार काहीच बोलण्याची गरज नाही. यामुळे त्यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अशा व्यक्ती आपली असुरक्षितता लपवण्यासाठी किंवा फक्त तुमच्यासोबत सेक्स करण्यासाठी असे बोलतात. असे बहुतांश पुरुष मंडळींनी मुलींना सांगितले असेल.

>>जर एखादा पुरुष तुम्हाला सेक्स केल्यानंतर म्हणत असेल की, खुप काळानंतर अशा पद्धतीचे सेक्स केल्याने संतुष्ट झालोय तर असे होऊच शकत नाही. त्यावेळी तुम्ही विश्वास ठेवू नये. कारण पुरुष मंडळी स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी आठवड्यातून काही वेळेस त्या संदर्भातील गोष्टी करतात. खासकरुन मास्टरबेशन करुन पुरुष मंडळी स्वत:ला संतुष्ट करतात.

>>तसेच ज्या मंडळी तुम्हाला त्यांच्या पेनिसच्या आकारासंदर्भात बोलतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण ही गोष्ट तुमच्या मधील संवादातील नसणेच योग्य आहे. कारण काही जणांना आपल्या पेनिसचा आकार मोठा असल्याचा घमंड असतो. त्यामुळे अशा मुर्खपणाच्या गोष्टींमागे पळण्याऐवजी आपली सुरक्षिततेकडे लक्ष द्या.

>>तुम्हाला कधी एखाद्या मुलाने सेक्स करण्यापूर्वी त्या संदर्भात लाजत माझ्या सोबत असे कधीच झाले नाही असे बोलल्याचे ऐकले आहे का? कारण पुरुष मंडळी बेडवर पार्टनरला खुश करण्यासाठी आणि आपला लाजाळूपणा दिसून येऊ नये यासाठी असे बोलतात. परंतु सेक्सच्या दरम्यान इरेक्शन नंतर ही गोष्ट खरी नाहीय असे बोलल्यास तुम्हाल कळेल की तो प्रत्येक वेळी खोट बोलत आला असेल.

नोट- वरील दिलेली माहिती ही फक्त प्राप्त झालेल्या गोष्टींच्या संदर्भातून दिली गेली आहे. त्यामुळे सुचनात्मक उद्देशाने हा लेख लिहिला असून कोणत्याही आजारासंबंधित योग्य तो सल्ला डॉक्टरांकडून घ्या.