राशी भविष्य 30 जानेवारी: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ तर कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या

30 जानेवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

30 जानेवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: या राशीच्या व्यक्तींवर कामाचा व्याप वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती कराल. मित्रपरिवारासह वेळ घालवाल. आजचा दिवस उत्साही जाईल. परंतु कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करा. घरातील मंडळींना तुमची चिंता सतावेल.

शुभ उपाय- लक्ष्मी व्रत पुस्तकाचे वाचन करा.

शुभ दान- गाईला चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. घरातील मंडळींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी कामात चुका होणार नाही याची काळजी घ्या.

शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे घालू नका.

शुभ दान- शंकराच्या देवळातील ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- गुलाबी

मिथुन: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नकारात्मक असणार आहे. अभ्यासात अडचणी असल्यास त्या बाबत शिक्षकांना विचारावे. नोकरदार वर्गाला आजचा दिवस ताणवपूर्ण असणार आहे. परंतु विचारपूर्वक कामे आणि निर्णय घ्या. घरातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- घरात गोमूत्र शिंपडा.

शुभ दान- केळीच्या पानावर नैवेद्य दाखवा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींनी आज संयमाने वागा. दुसऱ्यांशी वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील मंडळींच्या सल्ल्याने वागा.

शुभ उपाय- दही भात खा.

शुभ दान- पुस्तक दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

सिंह: आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून छानसे गिफ्ट भेटेल. आई-वडिलांकडून लग्नासंबधित गोड बातमी कळेल.

शुभ उपाय- दुरवांची जुडी बनवून गणपती मंदिरात ठेवा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- हिरवा

कन्या: या राशीतील व्यक्तींनी आज कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका.घरातील मंडळींची साथ लाभेल. परंतु वाद होणार नाही याची काळजी घ्या. मित्रपरिवासह बाहेर जा. प्रिय व्यक्तींकडून आनंदात वेळ घालवाल.

शुभ उपाय- नकारात्मक विचार करु नका.

शुभ दान- देवाला दुधाचा नैवेद्या दाखवा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी आज पैशांच्या व्यवहारात काळजी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून नव्या संधी उपलब्ध होतील. घरातील मंडळींशी आदराने वागा. कामे उद्यावर ढकलण्याचे टाळा.

शुभ उपाय- वृद्धांची सेवा करा.

शुभ दान- एखाद्याला आर्थिक मदत करा.

शुभ अंक-

शुभ रंग-

वृश्चिक: या राशीतील व्यक्तींनी आज कामाचे नियोजन करुन ती पूर्ण करा. नवी कार्य करण्यापूर्वी थोरल्यांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करा.

शुभ दान- अंथरुण दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- सोनेरी

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी दुसऱ्यांची खिल्ली उडणार नाही असे वागा. कामात चुका होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसह भांडण होईल. घरातील वातावरण ताणतणावाचे राहील. तरी मन शांत ठेवून विचारपूर्वक वागा.

शुभ उपाय- देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- अत्तर दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- जांभळा

मकर: या राशीतील व्यक्तींना आज व्यवहारातील थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात उत्साह वाटेल. घरातील मंडळींकडून कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवाल.

शुभ उपाय- अपशब्द वापरणे टाळा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

कुंभ: कुंभ राशतील व्यक्तींनी आज मित्रपरिवारासह बाहेर जा. वाहन सावधगिरीने चालवा. प्रिय व्यक्तीशी भांडण झाल्यास चुक मान्य करा. घरातील मंडळींच्या आज्ञा पाळा. नोकरीच्या ठिकाणी दक्षतापूर्वक काम करा.

शुभ उपाय- उत्तर दिशेला दिवा लावा.

शुभ दान- ब्राम्हणला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

मीन: या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस खुप आनंदात जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामे विचारपूर्वक करा. मोठ्या व्यक्तींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत करा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- देवाला नमस्कार करुन बाहेर पडा.

शुभ दान- फळ दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- क्रिम कलर

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now