Horoscope Today आजचे राशीभविष्य, रविवार 25 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, रविवार 25 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Horoscope Today आजचे राशीभविष्य, रविवार 25 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 25 June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 25 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीतील व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे, ज्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

शुभ उपाय- देवाला पांढरे फुल अर्पण करा.

शुभ दान- गरीब व्यक्तीला मदत करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- निळा

वृषभ (Taurus Horoscope Today):  खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

शुभ उपाय- शनि देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूंना कपडा दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कर्क (Cancer Horoscope Today): तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पिवळा

सिंह (Leo Horoscope Today): आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण त्याकडे योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणी कामे संयमाने पूर्ण करा. आज कामात नकळत चुका होण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

शुभ उपाय- घराबाहेर पडताना लाल फुल खिशात ठेवा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- लाल

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल तसेच नवीन संधी चालून येतील. प्रवास फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आज तुळ व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोलण्याची गरज आहे. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा. कपड्यांवर खर्च करणे टाळा.

शुभ उपाय- काळे तीळ आणि नारळ वाहत्या पाण्यात सोडा.

शुभ दान- रस्त्यातील गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- सोनेरी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. आज एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात होईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. वाहन जपून चालवा.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार खर्च करा. आज केलेल्या गुंतवणुकीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता. घरात एखादी नवीन गोष्ट येण्याची शक्यता.

शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरुजाला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): मकर राशीतील व्यक्तींनी आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आज नोकरी-व्यवसायातील अनेक कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा असेल मात्र संध्याकाळी सुखद धक्का मिळण्याची शक्यता. जवळच्या व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- गाईला चारा घाला.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कुंभ (Aquarius Horoscope Today): कुंभ राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

शुभ उपाय- जेवणानंतर काहीतरी गोड खा.

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

मीन (Pisces Horoscope Today): आजचा दिवस मीन राशीतील व्यक्तींसाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका. रखडलेली कामे पूर्ण होतील.

शुभ उपाय- सकाळी उठून तुळशीची पूजा करा.

शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2023 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).