राशी भविष्य 28 जुलै: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ, तर कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

28 जुलै 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणाला होणार आर्थिक लाभ? जाणून घ्या गुरुवारचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात चुका होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवल्यास ताणतणावापासून दूर राहिल्यासारखे वाटेल. घरातील मंडळींचे सहकार्य मोलाचे ठरेल.

शुभ उपाय- विचारपूर्वक वागा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

वृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

शुभ उपाय- वेळेनुसार कामे पूर्ण करा.

शुभ दान- केशरी रंगाचे वस्त्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी आज कोणतेही नवीन काम करण्यास सुरुवात करु नका. त्या कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- गुळ खाऊन बाहेर जा.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- निळा

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींनी चिडचिड होण्यापासून दूर रहा. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहिल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा.

शुभ उपाय- दही खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- गरीबाला जेवण द्या.

शुभ अंक- 7

शुभ रंग- लाल

सिंह: आजच्या दिवशी सिंह राशीतील व्यक्तींना दुसऱ्यांची मने जिंकल्याचा अनुभव येईल. कामाचे तुमच्या कौतुक केले जाईल. मित्रमंडळींची गाठभेट होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.

शुभ उपाय- दह्याचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- गुलाबी

कन्या: कन्या राशीतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज नव्या संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.

शुभ दान- गरजूंना उपयोगी वस्तू दान करा.

शुभ अंक-3

शुभ रंग- पिवळा

तुळ: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नोकरीच्या ठिकाणी तुळ राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मंडळींचा आदर करा. प्रिय व्यक्तीस वेळ द्या.

शुभ उपाय- कुलदैवताचे नामस्मरण करा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- गुलाबी

वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

शुभ उपाय- काळा रंगाचे वस्र परिधान करु नका.

शुभ दान- नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

धनु: धनु राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. पैसे खर्च कराल पण नंतर त्यावर जास्त विचार करु नका. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- देवाला दहीभाताचा नैवैद्य दाखवा.

शुभ दान- कापड दान करा

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

मकर:  आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रिय व्यक्तीकडून चुक झाल्यास ती समजून घ्या.

शुभ उपाय- गणपती स्तोत्र पठन करा

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- पांढरा

कुंभ: आजच्या दिवशी कुंभ राशीतील व्यक्तींनी आळसपणा सोडून राहिलेली कामे पूर्ण करा. नोकरच्या ठिकाणी कामात चुका करणे टाळा. प्रिय व्यक्तीसह प्रेमाने वागा. घरातील ताणतणापासून दूर रहा.

शुभ उपाय- गाईला चारा घाला.

शुभ दान- गरजूंना वस्त्रदान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आजूबाजूच्या व्यक्तींना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा,

शुभ उपाय- काहीतरी गोड खाऊन बाहेर पदा.

शुभ दान- गरजूंना पैसे दान करा,

शुभ अंक- 1

शुभ रंग- फिकट आकाशी