राशीभविष्य 29 मे 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

29 मे 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

राशी भविष्य-(फोटो सौजन्य- फाइल इमेज)

29 मे 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष:  घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

वृषभ: तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा

शुभ दान- अंथरुण दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

मिथुन: प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पांढरा

कर्क: मच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करताना घाई करू नका.

शुभ उपाय- हिरव्या रंगाच्या बुटांचा वापर करा

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- हिरवा

सिंह: दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

शुभ उपाय- निळकंठाची पूजा करा

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

कन्या: मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

तुळ: नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

वृश्चिक: चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु: तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- रक्तदान करा

शुभ अंक-5

शुभ रंग-करडा

मकर: आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

मीन: आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement