Akash Ambani-Shloka Mehta Wedding: आकाश-श्लोकाच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये मुकेश-नीता अंबानी यांचा 'ऐ मेरी जोहराजबी' गाण्यावर डान्स (Video)
सध्या स्विझरर्लंडमधील St Moritz मध्ये आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांचे प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु आहे.
Akash Ambani-Shloka Mehta Pre Wedding Celebration: रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याकडे सध्या दुसऱ्या लग्नाची धूम सुरु आहे. मुलगी ईशा अंबानीच्या लग्नानंतर मुकेश-नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) याच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. सध्या स्विझरर्लंडमधील St Moritz मध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचे प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु आहे. या कार्यक्रमात आमिर खान, करण जोहर, आलिया भट्ट यांच्यासारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अलिकडेच आकाश-श्लोकाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात चक्क मुकेश-नीता अंबानीही थिरकले. आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या शाही लग्नपत्रिकेचा थाट सोशल मीडियावर व्हायरल (Video)
सोशल मीडियावर आकाश-श्लोकाच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी थिरकताना दिसत आहेत. यात त्यांनी 'वक्त' सिनेमातील 'ऐ मेरी जोहरा जबी' या गाण्यावर डान्स केला. यावेळेस मुकेश अंबानी यांनी गुलाबाचे फुल देऊन नीता अंबानीसमोर आपले प्रेम व्यक्त केले. धमाल आणणारा हा डान्स व्हिडिओ तुम्ही एकदा पहा....
या वेळेस मुकेश अंबानी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि सिल्व्हर रंगाचे जॅकेट घातले आहे. तर नीता अंबानी सफेद लेहंग्यात सुंदर दिसत होत्या.
या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील श्लोका मेहता सोबत थिरकताना दिसला होता. 'गुलाम' सिनेमातील 'आती क्या खंडाला' गाण्यावर दोघांनी डान्स केला. आकाश-श्लोकाचा साखरपुडा गेल्यावर्षी गोव्यात झाला होता. सध्या प्री वेडिंग सेलिब्रेशनची धूम सुरु आहे. तर 9 मार्चला दोघांचाही शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडेल.