कलिंगडाच्या बिया शरीरासाठी उपयुक्त, जाणून घ्या हे फायदे
तर जाणून घ्या कलिंगडाच्या बिया कशाप्रकारे शरीराला फायदेशीर ठरतात.
उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्याने थकवा दूर होतो असं नेहमीच सांगितले जाते. तर उन्हाळ्यात खास करुन पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी कलिंगडाचेसुद्धा सेवन केले जाते. मात्र काहीजण कलिंगड खाताना त्याचा बिया खात नाही. खरं तर कलिंगडाच्या बिया शरीरासाठी उपयुक्त असल्याचे तज्ञ्जांकडून काही वेळेस सांगितले जाते. तर जाणून घ्या कलिंगडाच्या बिया कशाप्रकारे शरीराला फायदेशीर ठरतात.
- कलिंगडामध्ये ऍण्टीऑक्सिडंटचे प्रमाण खूप असते. त्यामुळे त्याच्या बिया ऍण्टीएजिंगचे काम करुन तुम्हाला तरुण दिसण्यास मदत करते.
- तर या बियांमध्ये लायकोपेन नावाच्या द्रव्यामुळे केस आणि त्वचा चमकदार होते.
- कावीळ झाली असल्यास कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास कावीळमुळे होणारे इन्फेक्शन दूर राहते.
- या बियांपासून चहा बनविल्यास मुत्रपिंडाचे आजार होत नाहीत.
-हृदयाचा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी या बियांचे सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरणाचे काम सुरळीतरित्या पार पडण्यास मदत होते.
- मधुमेह रुग्णांसाठी ही कलिंगडाच्या बिया त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात.