2020 मध्ये सोन्यासारखे चमकणार 'या' राशींमधील व्यक्तींचे भविष्य, जाणून घ्या तुमचा शुभ रंग काय असणार
त्यामुळे येणार नवं वर्ष तुमच्यासाठी कसे असणार किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्याने तुमचे 2020 हे वर्ष आनंदात जाईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नव वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येणार नवं वर्ष तुमच्यासाठी कसे असणार किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्याने तुमचे 2020 हे वर्ष आनंदात जाईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एवढेच नाही तर 2020 मध्ये कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ ठरणार याबाबत सुद्धा तुम्ही जाणून घ्या.
मेष: मेष या राशीसाठी 2020 मध्ये लाल रंग शुभ ठरणार आहे. या रंगाची वस्तू किंवा वस्र तुम्हाला लाभदायी ठरेल. तसेच येणाऱ्या नव वर्षात हा रंग तुम्हाला नेहमीच उत्तम संकेत देत राहिल. पुढील वर्ष मेष राशीसाठी फारच भाग्यशाली राहणार आहे.
वृषभ: या राशीसाठी सफेद रंग शुभ ठरणार आहे. हा रंग तुमच्या आयुष्यात शांती आणि यशाचे प्रतीक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे पुढील वर्ष वृषभ राशीमधील व्यक्तींसाठी 2019 पेक्षा उत्तम जाणार आहे.
मिथुन: मिथुन राशीमधील व्यक्तींसाठी नव वर्षात हिरवा रंग फार लाभदायी असणार आहे. कारण हिरवा रंग तुमच्या आयुष्यात आनंद आणि यशाचे मार्ग उघडणार आहे.
कर्क: या राशीमधील व्यक्तींसाठी जांभळा रंग शुभ ठरणार आहे. हा रंग तुम्हाला नव्या वर्षात आजारपण आणि कष्टापासून थोडे दूर ठेवणार आहे. जांभळा रंग पुढील संपूर्ण वर्षभरासाठी लकी ठरणार आहे.
सिंह: सिंह राशीसाठी गुलाबी रंग लाभदायी ठरणार आहे. हा रंग तुमच्या आयुष्यात प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाचा दुपट्टा किंवा ब्रेसलेट तुमच्या बॅगमध्ये ठेऊ शकता.
कन्या: या राशीमधील व्यक्तींसाठी लाइट ग्रीन हा रंग शुभ असणार आहे. 2020 मध्ये हा रंग तुम्हाला आयुष्यात योग्य मार्ग दाखण्यास मदत करणार आहे.
तुळ: तुळ राशीसाठी क्रीम कलर लकी ठरणार आहे. हा रंग नव्या वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यामुळे या रंगाची एखादी लहान वस्तू नेहमीच तुमच्या सोबत ठेवा.
वृश्चिक: या राशीमधील व्यक्तींसाठी नारिंगी रंग शुभ असणार आहे. या रंगाचे फळ किंवा भाजी खाल्लाने तुमचे आरोग्य पुढील वर्षात उत्तम राहणार आहे.
धनु: धनु राशीसाठी पिवळा रंग लाभदायी ठरणार आहे. या रंगाची एखादी वस्तू तुमच्या खरेदी करा किंवा कपडे परिधान केल्यास तुमच्यासाठी लकी ठरेल,
मकर: मकर राशीमधील व्यक्तींसाठी हिरवा रंग शुभ असणार आहे. घरात हिरव्या रंगाच्या वस्तू ठेवल्याने सुख-शांति लाभेल. ऑफिसध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या डेस्कवर हिरव्या रंगाचे छोटे झाड ठेवू शकता.
कुंभ: या राशीसाठी निळा रंग लाभदायी असणार असून त्यांनी या रंगाचे वस्र परिधान करावे. यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल. तसेच मानसिक तणावापासून दूर रहाल.
मीन: मीन राशीमधील व्यक्तींसाठी गोल्डन रंग फलदायी ठरणार आहे. 2020 मध्ये गळ्यात किंवा हातात सोन्याचा दागिना घातल्यास तो तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.