ISKCON Juhu Janmashtami 2021 Live Streaming: जन्माष्टमी 2021 निमित्त मुंबईच्या जुहू येथील श्रीकृष्ण मंदिराचे घ्या लाईव्ह दर्शन

गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते.

ISKCON Juhu Temple (Photo Credit: Twitter)

ISKCON Juhu Live Darshan 2021: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. महत्वाचे म्हणजे, द्वारका, मथुरा आणि वृंदावनप्रमाणे दरवर्षी मुंबईच्या जुहू येथील मंदिरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. परंतु, कोरानामारीमुळे भाविकांना यावर्षी मंदिरात प्रवेश नाही. मात्र, तरीही भाविकांना घरबसल्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे श्रीकृष्णाचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात जन्मष्टमीचा सोहळा साजरा केला जात आहे. हिंदू पुराणानुसार विष्णूचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्णाचा पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्म झाला. यावर्षी श्रीकृष्णाचा जन्मदिवस 30-31 ऑगस्टदरम्यान साजरा केला जात आहे. हे देखील वाचा- Janmashtami 2021: देशभरात आज साजरी केली जाणार श्रीकृष्ण जन्माष्टमी; राष्ट्रपती ते पीएम मोदी यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

लाईव्ह स्ट्रिमिंग-

 

कोरोना महामारीमुळे देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा निर्बंधांखाली साजरी करावी लागली आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. देशात येत्या सप्टेंबर किंवा आक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सरकार, महानगरपालिका आणि प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif