Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 28 फेब्रुवारी 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today

Horoscope Today 28 February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसायासाठी उत्तम वेळ मात्र पावले जपून टाका. नवीन कामात यश मिळण्याची शक्यता. आज दूरचा प्रवास टाळा. पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- हिरवा

वृषभ (Taurus Horoscope Today): वृषभ राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरूकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. नवीन कार किंवा घर घेण्यासाठी नव्या संधी चालून येण्याची शक्यता. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवतील. तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरू कराल.

शुभ उपाय- एखादी चांदीची वस्तू स्वतःजवळ ठेवा

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): आज वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक वृद्धीसाठी हा सुयोग्य काळ आहे. मात्र तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही स्वस्थ नसाल. आज अतिउत्साहीपणे वागण्यापेक्षा दुसऱ्यांचा सल्ला घेणे चांगले. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा

कर्क (Cancer Horoscope Today): आजचा दिवस शुभ असेल. आज योग्य दिशेने प्रवास घडेल आणि कामात यशही मिळण्याची शक्यता. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. मात्र आज आर्थिक उत्पन्न मिळण्यात थोडे अडथळे निर्माण होतील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- गायीला चारा द्या.

शुभ अंक- 8

शुभ रंग- केसरी

सिंह (Leo Horoscope Today): आज आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट सोसावे लागतील. आज खासगी आयुष्यात अनुरूपतेचा अभाव निर्माण होईल. पण थोडेसे प्रयत्न करून तुम्ही सगळे अडथळे पार कराल. तुमच्या जोडादाराशी प्रामाणिक राहा. मानसिक स्वास्थ्य बिघडेल त्यामुळे चिडचिड होईल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा, त्याने मन शांत होईल.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- आकाशी

कन्या (Virgo Horoscope Today): आजचा दिवस कष्टाचा असेल. मात्र त्याचे फळही नक्कीच मिळेल. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता, त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमप्राप्तीसाठी अनुकूल दिवस. कामाच्या ठिकाणी घडणारे बदल सकारात्मक निकाल घेऊन येतील. एखादी नवीन संधी चालून आली तर अजिबात सोडू नका.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी संयमी आणि काळजीपूर्वक वागा. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. आज आर्थिक बाजू बळकट असली तरी आंधळेपणाने गुंतवणूक करणे योग्य राहणार नाही.

शुभ उपाय- सकाळी कुलदेवतेची पूजा करा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज प्रकृतीमध्ये उतार-चढाव दिसून येतील. आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांसोबतचे संबंध चांगले ठेवा. नवीन संधी मिळतील. वादविवाद, अनावश्यक चर्चा टाळा. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचा व्यय होईल. व्यापार वर्गासाठी दिवस संमिश्र राहील.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. गोंधळून जाऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. हा तुमच्या क्षमता तपासण्याचा काळ आहे. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकेल, मात्र त्याकडे दुर्लक्ष करा.

शुभ उपाय- गायीला दूधभात खाऊ घाला.

शुभ दान- धान्य दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

मकर (Capricorn Horoscope Today): आज मन शांत ठेवण्याचा दिवस आहे. कुणी काही बोलले तरी फार मनावर घेऊ नका. आज विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल. आज ज्या काही औत्सुक्यपूर्ण घटना घडतील, नव्या संधी येतील त्यांचा वापर करून घ्या. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

कुंभ (Aquarius Horoscope Today): आज आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे व्यवस्थापन करताना घाबरून जाऊ नका. घरगुती समस्या उद्भवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी जोडीदाराची मदत घ्या. प्रेमप्रकरणांमध्ये फारसे समाधान लाभणार नाही. पण लक्षात ठेवा, जे होते ते चांगल्यासाठीच होते.

शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- गुलाबी

मीन (Pisces Horoscope Today): आज अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रवासाचा दिवस. नवीन गुंतवणूक करताना घरच्यांचा सल्ला घ्या. आज शक्यतो बाहेरचे खाणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी गणपतीची पूजा करा.

शुभ दान- कोणत्याही डाळीचे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा