कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावात AC चा वापर कसा करावा? COVID 19 च्या संकटात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात नेमकी कोणती काळजी घ्यावी? केंद्र सरकारने जारी केली नियमावली

त्यामुळे घरोघरी एअर कंडीशनर (AC) चा वापर अगदी सर्रास केला जाईल. मात्र कोरोना व्हायरसचे संकटात एसी वापरणे कितपत योग्य आहे? याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतील. केंद्र सरकारने यासंबंधित नियमावली जारी केली आहे.

Air Conditioner | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस या वैश्विक संकटाने भारतालाही मजबूत वेढा दिला आहे. सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र या गंभीर संकटाला परतवून लावण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाची चाहूल लागताच AC चा वापर कमी करावा अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र आता देशभरात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी एअर कंडीशन (AC) चा वापर अगदी सर्रास केला जाईल. मात्र कोरोना व्हायरसचे संकटात एसी वापरणे कितपत योग्य आहे? याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतील. केंद्र सरकारने यासंबंधित नियमावली जारी केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते? WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा

नियमावली नुसार, कोरोना व्हायरस संकटात घरातील एसीचे तापमान 24-30 डिग्री सेंटीग्रेड असायला हवे. तर ह्युमिडिटीचे प्रमाण 40-70% असायला हवे. ही नियमावली इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग एंड एयर कंडीशनर इंजीनियर्स (ISHRAE) द्वारा तयार करण्यात आली असून सरकारच्या सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट (CPWD) कडून जारी करण्यात आली आहे. ISHRAE च्या टीममध्ये शैक्षणिहेक, डिझायनर्स, निर्माते, सेवा स्वास्थ आणि विज्ञान संबंधित तज्ञांचा सहभाग आहे.

कोरड्या वातावरणात आद्रतेचे प्रमाण 40% हून कमी होणार नाही याची काळजी घ्या. तसंच एसी चालू नसतानाही घरातील हवा खेळती राहावी म्हणून दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा. शक्य असल्यास एग्जॉस्ट फॅन चालू ठेवा, असेही नियमावलीत सांगण्यात आले आहे.

इंडस्ट्रीज आणि कमर्शियल ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. लॉकडाऊनच्या काळात आर्द्रता आणि उष्णतेमुळे वातानुकूलित ठिकाणी  बुरशी धरण्याची संभावना अधिक असते. त्यामुळे अशी ठिकाणं आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकतात. त्याचप्रमाणे  AC Ducts मध्ये पक्षांच्यी विष्ठा, पालापाचोळा त्याचप्रमाणे किटकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे या नियमावलीद्वारे सूचित करण्यात आले आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना