शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत देतात ही '७' लक्षणे !
कोलेस्ट्रॉलची गरजेपेक्षा अधिक निर्मिती झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते.
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. याची निर्मिती यकृत (लिव्हर) मध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. याची निर्मिती गरजेइतकीच झाली तर आपल्या स्वास्थ्यासाठी योग्य ठरतं. पण गरजेपेक्षा अधिक निर्मिती झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया काही लक्षणे जी कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत देतात...
लवकर थकणे किंवा धाप लागणे
काही अंतर चालल्यावर थकवा जाणवत असेल किंवा धाप लागत असेल तर हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा संकेत आहे. तुम्हालाही हा त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.
सतत पाय दुखणे
विनाकारण सतत पायदुखी जाणवत असल्यास हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. पण अनेकदा याकडे गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. परंतु, याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल. त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
खूप घाम येणे
घाम येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब कोलेस्ट्रॉलची तपासणी करुन घ्या.
अचानक वजन वाढणे
वजन अचानक वाढले असल्यास किंवा तुम्हाला शरीरात जडत्व जाणवत असल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेले असू शकते. अशावेळी लगेचच डॉक्टरांची भेट घेणे योग्य ठरेल.
रक्तदाब वाढणे
रक्तदाब अचानक वाढणे हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो. म्हणून लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
छातीत दुखणे किंवा बैचेन वाटणे
छातीत दुखणे किंवा बैचेन वाटणे अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या. कारण हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो.
हृदयाचे ठोके वाढणे
हृदयाचे ठोके वाढले असल्यास वेळीच चेकअप करणे फायदेशीर ठरेल. कारण शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाला रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.