Monsoon Health Tips: पावसाळ्यात 'या' 5 हेल्थ टिप्सचा अवलंब करून आजारांपासून रहा दूर
म्हणूनच या जंतूंपासून शरीराचे संरक्षण आपणच केले पाहिजे. चला जाणून घेऊया असे काही उपाय आणि आरोग्य टिप्स ज्याद्वारे आपण पावसाळ्यात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकू.
Monsoon Health Tips: पावसाळा कोणाला आवडत नाही? रिमझिम पाऊस, चहूबाजूंनी हिरवळ आणि मातीचा सुगंध यामुळे जणू पृथ्वीचा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटत असला तरी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या मान्सूनमुळे आजारांचा धोकाही वाढतो. या मोसमात ताप, सर्दी-खोकला, अन्नातून विषबाधा, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका दुपटीने वाढतो. म्हणूनच या जंतूंपासून शरीराचे संरक्षण आपणच केले पाहिजे. चला जाणून घेऊया असे काही उपाय आणि आरोग्य टिप्स ज्याद्वारे आपण पावसाळ्यात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकू.
पावसाळ्यात अवलंबा 'या' हेल्थ टिप्स -
फळे आणि भाज्या धुवून घ्या -
पावसाळ्यात अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू जन्माला येतात. ते फळे आणि भाज्यांमधून आपल्या घरात प्रवेश करू शकतात. म्हणूनच या ऋतूमध्ये आपण फळे आणि भाज्यांचा वापर विशेषतः धुतल्यानंतर केला पाहिजे. (हेही वाचा -Benefits Of Mango: आंबा खाल्ल्याने होतात 'हे' 10 फायदे; फळांच्या राजाचे हे महत्त्वपूर्ण गुणधर्म तुमच्या आरोग्यासाठी ठरतील गुणकारी, वाचा सविस्तर)
शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका -
उन्हाळ्यात आपण पाणी पिण्याची खूप काळजी घेतो. मात्र, पावसाळ्यात या सवयीकडे दुर्लक्ष करतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊन अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच पाण्यासोबत इतर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे.
स्वच्छतेची काळजी घ्या -
प्रत्येक ऋतूत स्वच्छता महत्त्वाची असली तरी पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आपण स्वच्छतेची अधिक काळजी घेतली पाहिजे. जेवणापूर्वी हात साबणाने किंवा हँडवॉशने धुवावेत. खोकल्यावर आणि शिंकल्यावरही हात धुवा. कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात धुवा.
डासांपासून दूर राहा -
पावसाळ्याच्या दिवसात असे कपडे घाला जे हात पाय झाकतील. कारण, या मोसमात मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार डासांमुळे पसरतात. घरात कुठेही उघडे पाणी सोडू नका, त्यामुळे डासांची संख्या वाढते. बाहेरचे पाणी पिऊ नका आणि घाण पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नका.
पावसात भिजल्यावर लगेच आंघोळ करा -
पावसात भिजणे टाळा आणि भिजत असाल तर घरी येताच आंघोळ करा. तसेच कोरड्या टॉवेलने अंग कोरडे करा. हे ऍलर्जी आणि जंतू तुमच्या शरीरापासून दूर ठेवेल. खोबरेल तेल लावून त्वचेचीही काळजी घ्या.