Coronavirus रोखण्यासाठी वारंवार वापरताय सॅनिटायझर? 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या
हे तोटे कोणते आणि त्यानुसार आपण कोणती खबरदारी घ्यायला हवी हे आज आपण जाणुन घेउयात.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष सरकारकडूनच मास्क आणि सॅनिटायजर्स (Sanitizers) वापरण्याचे आवाहन केले जात आहे. वास्तविक स्वच्छतेसाठी हे सॅनिटायजर्स वापरनी फायदेशीर सुद्धा आहेच, पण काही मंडळी या गोष्टीचा अति वापर करताना आढळून येतात, मात्र वारंवार हाताला सॅनिटायझर लावून स्वच्छ करण्याचा हा हट्ट आपल्यावरच उलटा पडू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अलीकडेच अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चनुसार, सतत सॅनिटायझर्सचा वापर करण्याने काही तोटे देखील सहन करावे लागू शकतात. हे तोटे कोणते आणि त्यानुसार आपण कोणती खबरदारी घ्यायला हवी हे आज आपण पाहणार आहोत. Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई
सॅनिटायझर च्या अतिवापराचे तोटे
- सॅनिटायझर्सचा वापर हा पर्यायी मार्ग आहे त्याला स्वच्छतेचे मुख्य साधन समजू नका. म्हणजेच काही जण घरी असताना, बाहेरून आल्यावर, जेवणाच्या आधी/ नंतर सुद्धा सॅनिटायजरनेच स्वच्छता करतात. हा अतिवापर म्हणता येईल. याऐवजी पाण्याने हात धुण्यास प्राधान्य द्या.
- सॅनिटायजर्स मधील अल्कोहोल चे प्रमाण त्वचेसाठी अनेकदा घातक ठरू शकते, यातून हाताची त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊ पडणे, त्यामुळे भेगा पडणे, खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी आपल्या त्वचा प्रकारानुसार माईल्ड सॅनिटायझर्स निवडा.
- लहान मुलांना या सॅनिटायजर्समुळे मळमळणे, पोटदुखी असे अनेक त्रास होत असल्याची काही उदाहरणे मागील काळात समोर आली आहेत. शक्य असल्यास त्यांना पाणी आणि साबण किंवा हॅन्ड वॉश नेच स्वायत्त बाळगण्याची सवय लावा.
- सॅनिटायजर्सच्या अति वापरणारे त्वचेवरील छिद्रे उघडे होतात, त्यामुळे नंतर त्यात माती, धूलिकण जाऊन अधिक त्रास होऊ शकतो.
कसे वापरावे सॅनिटायजर?
-हाताच्या पृष्ठभागावर सॅनिटायझर घ्या आणि 20 सेकंदांपर्यंत हात चोळा.
-जर हात अगदीच नाजूक आणि नरम असतील, तर साबण आणि पाण्याचा वापर करून हाताने 20 सेकंद धुवा.
दरम्यान, असे म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईटच हाच नियम याबाबतही लक्षात ठेवा. सद्य घडीला देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत, आज यापैकी पहिला मृत्यू देखील झाला आहे, अशावेळी अनेकांमध्ये भीती स्वाभाविक आहे मात्र संयमाने वागणे अधिक फायद्याचे ठरेल हे विसरू नका.