No Bra Days एन्जॉय करताय? पण ब्रा न घातल्याने तुमच्या स्तनांना होऊ शकते 'हे' नुकसान, वेळीच सावध व्हा!

आजवर आपण ब्रा न घालण्याचे फायदे वाचून, एकून जाणून असाल पण आज आपण या लेखातून ब्रा न घातल्याने नेमकं काय नुकसान होतं हे पाहणार आहोत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

लॉक डाऊन (Lockdown) मध्ये दिवसभर घरीच असल्याने अनेक महिलांना ब्रा (Bra) पासून सुटका मिळाली आहे. दिवसातील अर्ध्या हुन जास्त वेळ घट्ट ब्रा  (Tight Bra) घालून होणारा त्रास वाचत असल्याने आपण निश्चितच या एका कारणाने लॉक डाऊन एन्जॉय करत असाल. पण महिलांनो, या आनंदात गाफील राहू नका. ब्रा न घालण्याने तुमच्या स्तनांना तुम्ही विचारही केला नसेल इतके नुकसान पोहचू शकते. होय, आजवर आपण ब्रा न घालण्याचे फायदे वाचून, एकून जाणून असाल पण आज आपण या लेखातून ब्रा न घातल्याने नेमकं काय नुकसान होतं हे पाहणार आहोत. How To Choose Perfect Bra: तुम्हाला कम्फर्टेबल व फॅशनेबल ठेवणारी ब्रा निवडताना नक्की फॉलो करा 'हे' गोल्डन रूल

वास्तविक ब्रा न घालणे हे शरीराच्या फायद्याचे असल्याचे अनेकांनी आजवर सांगितले आहे. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते, रॅशेस, किंवा त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत मात्र एक लक्षात घ्या या समस्या ब्रा घातल्याने नव्हे तर चुकीची ब्रा घातल्याने होत असतात. तुम्ही तुमच्या साईझ प्रमाणे, कम्फर्टेबल कपड्याच्या ब्रा वापरल्यास असे त्रास होत नाहीत, त्यामुळे तुम्ही ब्रा निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे. अंतर्वस्त्रे निवडताना घ्या अशी काळजी, नाहीतर 'प्रायव्हेट पार्टस'वर होईल हा परिणाम

Sagging Boobs

ब्रा न घातल्याने होणारे तोटे पाहायला गेल्यास स्तनांचे लटकणे हा सर्वात मोठा त्रास म्हणता येईल. ब्रा नसल्याने तुमच्या स्तनांना कोणताही आधार मिळत नाही, परिणामी त्यांच्यातील स्नायू अधिक काळासाठी खालील दिशेस झुकू लागल्याने स्तन सुद्धा Loose होतात, इंग्रजी मध्ये याला Boobs Sagging असे म्हंटले जाते. अर्थात सुडौल स्तन हे कोणत्याही महिलेसाठी सौंदर्याचा ब्राउनी पॉईंट म्हणतात अशा वेळी हे नुकसान नक्कीच तुम्हालाही नको असेल ना?

Stretch Marks

अर्थात बूब्स जेव्हा खालील दिशेला अधिक झुकू लागतात तेव्हा त्यांच्यातील स्नायू आणि पेशी सुद्धा जास्त भर सहन न झाल्याने कमजोर होतात. हळूहळू स्तनांवर सुद्धा स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.

पाठदुखी

ज्यांचे स्तन मोठे असतात त्यांना तर हा त्रास आवश्य जाणवतोच, याचे कारण असे की स्तनांच्या वजनाने शरीर पुढील बाजूस झुकले जाते, अशावेळी ब्रा स्तनांना आधार देऊन योग्य Posture ठेवण्यास मदत करते, मात्र ब्रा च न घातल्याने हा आधार मिळत नाही आणि परिणामी पाठदुखी सारखा त्रास सुद्धा उद्भवतो.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, असे त्रास तुम्हालाही होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif