दीर्घकाळ काम केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवण्याची शक्यता, WHO ने दिला इशारा
मात्र काहीजणांना दीर्घकाळ काम करावे लागत असल्याने त्यांना थकवा येण्यास त्यांची चिडचिड होते. मात्र या व्यतिरिक्त आता डब्लूएचओ कडून एक महत्वाची बाब दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी सांगण्यात आली आहे.
सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने कामाचा ताण थोडा वाढलेला आहे. मात्र काहीजणांना दीर्घकाळ काम करावे लागत असल्याने त्यांना थकवा येण्यास त्यांची चिडचिड होते. मात्र या व्यतिरिक्त आता डब्लूएचओ कडून एक महत्वाची बाब दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी सांगण्यात आली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, दीर्घकाळ काम केल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. याच कारणामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. Environment International मध्ये छापण्यात आलेल्या WHO आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाइजेशन (ILO) च्या अभ्यासानुसार, 2016 मध्ये दीर्घकाळ काम केल्याने स्ट्रोक आणि हृहय विकाराने 7,45,000 लोकांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी आता 29 टक्क्यांनी वाढली आहे. डब्लूएचओ ने हा रिपोर्ट गेल्या महिन्यात जाहीर केला होता.
घरातून ऑफिसचे काम केले जात असल्याने लोकांचा स्क्रिन टाइम वाढला आहे. WHO आणि ILO च्या रिपोर्ट्सनुसार, कामचा ताण सर्वाधिक पुरुषांवर पडला जात आहे. रिपोर्ट्समध्ये 45 ते 74 वर्षादरम्यान प्रत्येक आठवड्याला 55 तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करणाऱ्या पुरुषांच्या मृत्यूचा आकडा 72 टक्के होता.(COVID 19 Vaccine FAQs: कोविड 19 लसींमुळे वंध्यत्व येते का ते भविष्यात बूस्टर डोस घेण्याची वेळ आली तर तीच लस घ्यावी लागते का? पहा तुमच्या मनातील लसीकरणाबाबतच्या प्रश्नांची एक्सपर्ट उत्तरं)
डॉक्टर्सला सुद्धा कामामुळे होणाऱ्या मानसिक तणाव आणि दृदयासंबंधित आजार जडत आहेत. मेडिकवर हॉस्पिटल्स मधील कार्डियक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉक्टर कुमार नारायण यांनी द इंडियन एक्सप्रेस यांना म्हटले की, सध्या कामाचे तास वाढले असून ताण सुद्धा तितकाच वाढला आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. याच कारणामुळे खाण्यापिण्यासंबंधित चुकीच्या सवयी अंगी पडतात. त्याचसोबत धुम्रपान, झोप पूर्ण न होणे आणि सुस्ती सारख्या समस्या वाढतात. या सर्व गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
दीर्घकाळ कामाच्या तासांचा मानसिक रुपात सुद्धा त्रास अधिक होत आहे. कामाच्या तणावामुळे काही लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर जे लोक धुम्रपान करतात किंवा व्यायाम करत नाही त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अधिक असतो. ऐवढेच नव्हे तर तणाव हृदयावर सुद्धा थेट परिणामकारक ठरु शकतो.