Kawasaki Syndrome: कोरोना व्हायरसनंतर भारतामध्ये उद्भवू शकतो कावासाकी सिंड्रोमचा धोका; चेन्नईमध्ये 8 वर्षाच्या मुलामध्ये आढळली लक्षणे
देशातील कोरोना (Coronavirus) च्या संकटकाळात चेन्नई (Chennai) मधील आठ वर्षाच्या मुलामध्ये कावासाकी आजाराची (Kawasaki Disease) लक्षणे दिसू लागली आहेत. भारतामधील या आजाराची ही पहिलीच घटना आहे
देशातील कोरोना (Coronavirus) च्या संकटकाळात चेन्नई (Chennai) मधील आठ वर्षाच्या मुलामध्ये कावासाकी आजाराची (Kawasaki Disease) लक्षणे दिसू लागली आहेत. भारतामधील या आजाराची ही पहिलीच घटना आहे. मात्र, इम्युनोग्लोब्युलिन आणि टॉसिलिझुमाबॅब औषधे दिल्यानंतर हे मूल बरे झाले आहे. या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्याला गंभीर अवस्थेत चेन्नईच्या कांची कामकोटी चाइल्डस् ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथे डॉक्टरांच्या पथकाने त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. तपासणी दरम्यान, मुलाला हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोम (Hyper-Inflammatory Syndrome) आणि कोरोना व्हायरस रोगाची लक्षणे आढळली.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलाच्या सुरुवातीच्या तपासणीत निमोनिया, कोविड-19 पेनुमोनिटिस, कावासाकी रोग आणि सेप्टिक शॉकसह विषारी शॉक सिंड्रोमची लक्षणे दिसून आली होती. प्राथमिक अहवालानुसार कावासाकी रोगादरम्यान मुलांना काही दिवस जास्त ताप येतो, तसेच पोटात दुखणे, अतिसार, डोळ्यांचा लालसरपणा आणि जिभेवर लाल पुरळ अशी काही लक्षणे दिसतात, काही मुलांच्या शरीरावरही पुरळ उठतात. ब्रिटनमध्ये या आजाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी कावासाकी रोगाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. द सनच्या म्हणण्यानुसार 5 वर्ष ते 16 वर्षे वयोगटातील मुले कावासाकी या संसर्गजन्य आजाराची शिकार होत आहेत. आतापर्यंत यूकेमधील 100 मुलांना कावासाकी आजाराने ग्रासले आहे. (हेही वाचा: COVID19 शी लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची Immunity वाढवण्यासाठी सरकार देणार Arsenicum Album 30 आणि Camphora 1m या औषधांचे डोस)
Amphan Cyclone: चक्रीवादळाचं पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये थैमान; १०-१२ जणांच्या मृत्युचा अंदाज - Watch Video
द लेंसेटच्या मते, कावासाकी आणि कोविड-19 मध्ये नक्कीच काहीतरी दुवा आहे. उत्तर इटलीच्या सर्वात कोरोना-बाधित भागामध्ये कावासाकी रोगात 30 पट वाढ झाली आहे. नवीन अभ्यासानुसार 18 फेब्रुवारी ते 20 एप्रिल दरम्यान 10 मुलांमध्ये अशीच लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी या आजाराचे नाव पेडियाट्रिक इंफ्लेमेटरी मल्टी-सिस्टम सिंड्रम असे ठेवले आहे, ज्याचा संबंध SARS-Cov-2 जोडला गेला आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहेत, अशात कावासाकी आजारही देशावर घिरट्या घालू शकतो असा अंदाज लावला जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)