Double Lung Transplant for Covid-19 Patient: हैदराबाद मध्ये कोरोनाबाधित रूग्णावर दोन्ही फुफ्फुसांच्या प्रत्यारोपण ऑपरेशन; भारतातील पहिलीच शस्रक्रिया
हैदराबाद मध्ये Krishna Institute of Medical Sciences (KIMS) रूग्णालयामध्ये कोविड 19 च्या रूग्णावर देशातील पहिली दोन्ही फुफ्फुसं प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे.
हैदराबाद मध्ये Krishna Institute of Medical Sciences (KIMS) रूग्णालयामध्ये कोविड 19 च्या रूग्णावर देशातील पहिली दोन्ही फुफ्फुसं प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे. मोहम्मद रिझवान ( Md Rizwan alias Monu) असं रूग्णाचं नाव असून तो 32 वर्षीय आहे. दरम्यान चंदीगढच्या रिझवानला कोलकाता मधील एका ब्रेड डेड व्यक्तीचं फुफ्फुसं देण्यात आलं होतं. शुक्रवारी (11 सप्टेंबर) दिवशी मोहम्मद याला हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली आहे.
डॉ. संदीप अट्टावार या हैदराबादमधील KIMS रूग्णालयाच्या डॉक्टराच्या नेतृत्त्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतरही त्याला काळजी घेणं आवश्यक आहे. बायो बबल वातावरण आणि किमान 6 आठवडे योग्य प्रमाणात औषधं घेण6 आवश्यक आहे.
डॉ. अट्टावार हे thoracic organ transplantation surgeon आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अत्यावस्थ परिस्थितीमध्ये रिझवान हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्याची प्रकृती खालावत होती. अशावेळेस केवळ फुफ्फुसाचे प्रत्यारोपण हाच उपाय त्याच्यासाठी जीवनदान देणारा होता.
रिझवान याच्या दोन्ही फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाची तो वाट पाहत असतानाच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. परिणाम त्याचा त्रास अधिकच बळावला. कोरोना मुळे त्याला आवश्यक असणारी ऑक्सिजनची गरज ही मागील 8 आठवड्यामध्ये प्रति मिनिट 15 लीटर वरून सुमारे 50 लीटर प्रति मिनिट गेली होती.
सुदैवाने त्याच्या रक्तगटाला जुळणारा एक व्यक्ती कोलकत्ता मध्ये ब्रेनडेड असल्याचं समजलं. Harvested Lungs त्यानंतर एअरलिफ्ट करून हैदराबाद मध्ये आणण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया किचकट आणि चूकांना अत्यल्प मुभा देणारी आहे. रिझवानच्या प्रकरणात ते वेळीच उपलब्ध झाल्याने जीव वाचवण्यास यश आले असे डॉक्टरांचे मत आहे.