Health Benifits of Ashwagandha: अश्वगंधाचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या अधिक

अश्वगंध (Photo Credits-Facebook)

Health Benifits of Ashwagandha: अश्वगंध हे नाव आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शतकानुशतके अश्वगंध अनेक रोगांच्या उपचारासाठी वापरले जात आहे. अश्वगंधा हे महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक आहे.

अथर्ववेदात अश्वगंधाचा वापर आणि उपस्थिती यांचा उल्लेखही आहे. अश्वगंधा हे भारतीय पारंपारिक औषध प्रणालीमध्ये एक चमत्कारी आणि तणावविरोधी औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.

तणाव आणि चिंताग्रस्त विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बहुतेक औषधी वनस्पतींमध्ये अश्वगंधाचा समावेश केला जातो. तर जाणून घ्या अश्वगंधाचे आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात त्याबद्दल अधिक.

-अश्वगंधा सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. उंदीरांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले आहे की अश्वगंधा सेवन केल्याने उंदरांमध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. यावरून असे मानले जाऊ शकते की मनुष्याच्या लाल रक्त पेशींवर अश्वगंधा सेवन केल्याने सकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अशक्तपणासारख्या परिस्थितीस प्रतिबंध होऊ शकतो.

-श्वगंधा मध्ये शतकानुशतके कामोत्तेजक गुणधर्म असल्याचे मानले जात आहे आणि लोक त्यांची जीवनशक्ती आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी औषध म्हणून याचा वापर करत आहेत.

-अश्वगंधा अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. हे अँटीऑक्सिडेंट चयापचय प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सची साफसफाई आणि त्यांना बेअसर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

-अश्वगंधा शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करून केस गळणे नियंत्रित करते. अश्वगंधा केसांमध्ये मेलेनिन नष्ट होण्यापासून रोखून केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखते. अश्वगंधामध्ये टायरोसिन असते जो एक अमीनो ऍसिड आहे जो शरीरात मेलेनिनच्या उत्पादनास उत्तेजित करतो.

अश्वगंधेमध्ये, सूज कमी करणारे गुणधर्म तसेच अँटीऑक्सिडेंट्स आणि तणाव कमी करणारे गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हे हृदयाच्या स्नायूंना मजबूत बनवतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif