सुकलेली पपई खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

परंतु, सुकलेली पपई खाणंदेखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. सुकलेल्या पपईमुळे आपली भूक वाढते. त्यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. चला तर मग या खास लेखातून जाणून घेऊयात सुकलेली पपई खाण्याचे फायदे.

Dry Papaya (Photo Credit - File Photo )

ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळे खाणं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पपई या फळाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. पपई (Papaya) आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आहारात समावेश करणं अधिक फायदेशीर आहे. पपईमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, प्रोटीन, कॅरोटीन आणि नैसर्गिक स्वरूपातील फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात.

त्यामुळे आपले पचनसंस्थेचे कार्य सुधारायला मदत होते. पपईमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. पपई खाल्ल्याने शरीरातील ‘क’ जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते. पिकलेल्या पपईबरोबरच कच्ची पपई खाण्याचे आपल्या आरोग्याला फायदे आहेतच. परंतु, सुकलेली पपई (Dry Papaya) खाणंदेखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. सुकलेल्या पपईमुळे आपली भूक वाढते. त्यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. चला तर मग या खास लेखातून जाणून घेऊयात सुकलेली पपई खाण्याचे फायदे.

हेही वाचा - Health Tips: थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यास मदत करतील हे '5' झटपट उपाय

सुकलेली पपई खाण्याचे फायदे –

दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकवा जाणवतो. अशावेळी सुकलेली पपई खाल्ल्याने थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राहण्यासही मदत होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)