Hand Foot and Mouth Disease: देशात लहान मुलांमध्ये वाढत आहे हात-पाय आणि तोंडाचे आजार; आरोग्य विभाग सतर्क, व्हिडीओमधून जाणून घ्या नक्की काय आहे हा संसर्ग (Watch)
परंतु, लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात. या आजाराच्या वाढत्या घटना पाहता आता अलीला मेडिकल मीडिया (Alila Medical Media) ने एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या केसेसमध्ये आता देशातील अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे आजार (Hand Foot and Mouth Disease) पसरत आहेत. आतापर्यंत या आजाराची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जे सर्व वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील शाळांना एक नोडल अधिकारी किंवा पर्यवेक्षक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जो दररोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक वर्गातील मुलांची तपासणी करेल.
यावेळी, मुलांना ताप तर नाही ना किंवा मुलांच्या जिभेवर फोड, हात किंवा पायांच्या तळव्यावर पुरळ इ. गोष्टी नाहीत ना हे पाहिले जाईल. अशी लक्षणे दिसणाऱ्या मुलांची माहिती तातडीने आरोग्य विभागाला दिली जाईल. आरोग्य विभागाचे जिल्हा एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. दिवज्योत सिंग यांनी सांगितले की, हा आजार प्रामुख्याने पाच ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना होतो. हा रोग खूप संसर्गजन्य आहे आणि एका मुलापासून दुसऱ्या मुलामध्ये वेगाने पसरतो. पीडित मुलाला 10 दिवसांसाठी विलगीकरणामध्ये ठेवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Monkeypox Virus in Semen: 'मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतरही अनेक आठवडे व्यक्तीच्या विर्यामध्ये राहतो विषाणू'- New Study)
डॉ.दिवज्योत सिंग म्हणाले की, हात, पाय आणि तोंडाच्या या आजारात बाधित मुलांची भूक कमी होते. त्यांच्या शरीरावर पुरळ दिसून येतात, त्यांना थकवा जाणवू लागतो, घसा दुखू लागतो, यासोबत मुलाचे नाक वाहू लागते आणि तोंडातून लाळ येते. तोंडाला फोड येणे, हात-पायांवर लाल पुरळ येणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, हा रोग गंभीर नाही. ही समस्या दोन आठवड्यांत दूर होऊ शकते. परंतु कधीकधी क्वचित प्रसंगी स्थिती गंभीर बनते आणि मुलाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
अशा हातपाय आणि तोंडाच्या आजारासाठी किंवा HFMD साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु, लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात. या आजाराच्या वाढत्या घटना पाहता आता अलीला मेडिकल मीडिया (Alila Medical Media) ने एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये हात पाय आणि तों डाच्या आजाराबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओद्वारे तुम्ही समजून घेऊ शकता की हा आजार नेमका काय आहे.