3-Foot Tall Dr. Ganesh Baraiya: डॉ. गणेश बरैया, तीन फुट उंची MBBS करण्यासाठी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई; वाचा एका संघर्षाची कहाणी (Watch Video)
डॉ. गणेश बरैया, उंची केवळ तीन फूट असल्याने ते पेशंट्सना योग्य पद्धतीने हाताळू शकणार नाहीत, असे म्हणत त्यांना डॉक्टर होण्यापासून रोखण्यात आले. त्यांना MBBS प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, त्यांना तिथेही नकारघंटा आली. शेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली आणि न्याय मिळवला.
World Shortest Doctor: डॉक्टर होणे अनेकांचे स्वप्न असतं. त्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. काहींना अभ्यासामुळे काहींना प्रयत्नात यश न आल्याने डॉक्टर होता येत नाही. डॉ. गणेश बरैया (Dr. Ganesh Baraiya) यांची कहाणी यापेक्षा काहीशी निराळी आहे. त्यांना केवळ त्यांच्या उंचीमुळे डॉक्टर होण्यापासून रोखण्यात आले. होय, त्यांची उंची केवळ तीन फूट असल्याने ते पेशंट्सना योग्य पद्धतीने हाताळू शकणार नाहीत, असे म्हणत त्यांना डॉक्टर होण्यापासून रोखण्यात आले. त्यांना MBBS प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, त्यांना तिथेही नकारघंटा आली. शेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली आणि न्याय मिळवला. आता ते गुजरात सरकारी रुग्णालयात डॉक्टर (Dr. Ganesh Baraiya Hospital) म्हणून नियुक्त झाले आहेत. उल्लेखनीय असे की, डॉ. गणेश बरैया हे जगातील सर्वात छोटे डक्टर ठरले आहेत.
उंची पाहून नाकारण्याचे सागितले कारण
डॉ. गणेश बरैया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आता ते अधिकृतपणे डॉक्टर बनले आहेत. इतरांचे डॉक्टर होणे हे भलेही साधारण बाब असेल. माझ्यासाठी मात्र ती आव्हानात्मक राहीली. माझी तीन फुटाची उंची हात अनेकांसाठी वाद आणि चर्चेचा विषय राहिला. त्यामुळे मला MBBS अॅडमिशन घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. 'मेडिकल काउसिंल ऑफ इंडिया की कमेटी' ने मला केवळ माझ्या उंचीमुळे (तीन फूट) पाहून नाकारले होते. त्यांनी म्हटले होते की, आपत्कालीन स्थितीमध्ये आलेली प्रकरणे, रुग्ण मी हाताळू शकत नाही. भावनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मी गुजरात हाटकोर्टात गेलो. तिथेही निकाल माझ्या विरोधात गेला. त्यानंतर दोन महिन्यांनी 2018 मध्ये मी सर्वोच्च न्यायालात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने मात्र माझी बाजू ऐकली आणि सन 2019 मध्ये मला MBBS ला प्रवेश दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मी डॉक्टर होऊ शकलो, असे बरैया अभिमानाने सांगतात. (हेही वाचा, Afshin Esmaeil Ghaderzadeh: क्रिकेट बॅट पेक्षा कमी उंचीचा, जगातील सर्वात बुटका माणूस, उंची फक्त 2.6 इंच, नाव-अफशीन इस्माइल घदरजादेह; घ्या जाणून)
व्हिडिओ
लहानपणापासूनच अनेक आव्हाने
डॉ. गणेश बरैया पुढे बोलताना सांगतात, माझ्यासोबतच आणखी दोन सदस्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ते खटला हारले. त्यामुळे मी काहीसा नाराज झालो मात्र, मी हिंमत सोडली नाही. हायकोर्टाविरोधात मी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. सध्या मी भावनगर येथील सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस अभ्यासक्रमक यशस्वी उत्तीर्ण केला. गणेश सध्या 23 वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, गणेश यांच्यासोबत नियतीने लहानपणापासून अनेक आव्हाने उभी केली होती. त्यांचे डोके प्रचंड मोठे होते आणि शरीर अजिबात वाढत नव्हते. त्यामुळे ते वयाने मोठे होत गेले. मात्र, त्यांची उंची वाढू शकली नाही. (हेही वाचा, World's Oldest Person Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
डॉ. गणेश यांचे वडील सांगात, त्यांच्या कुटुंबाने ईश्वराकडे अनेक प्रार्थना केल्या. पण, त्यांचे गाऱ्हाणे देवाने ऐकलेच नाही. एकदा तर गंमतच झाली. एका व्यक्तीने गणेश यांना खास ऑफर दिली. त्या व्यक्तीने एक लाख रुपये देतो असे सांगितले आणि गणेश यांना सर्कसमध्ये बुटका जोकर म्हणून येण्याचे अवाहन केले. ज्यामुळे आम्हा कुटुंबीयांना प्रचंड वेदना झाल्या. गणेश यांचे कोणी अपहरण करेन अशी सतत भीती असल्यामुळे वडील दररोज त्याला सोडण्यासाठी शाळेत जात असत, अशीही आठवण ते सांगतात. शाळेमध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या. दरम्यान, दलपत कटारिया यांच्या शाळेत त्यांना 4 लाख रुपयांची मदत झाली ज्यामुळे त्यांचा मार्ग पुढे अधिक सूखकर झाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)