Coronavirus मधून बऱ्या झालेल्या महिलेने फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला अनुभव; पहा Viral Post

एलिझाबेथ स्नायडर असे या महिलेचे नाव असून तिने आपले अनुभव, या आजाराची लक्षणे या बद्दल एक पोस्ट केली आहे.

Elizabeth Schneider, A Coronavirus Patient (Photo Credits: Facebook)

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) नागरिकांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. दिवसागणित कोरोनाच्या रुग्णांची वाढत जाणारी संख्या, मृत्यूचे आकडे यामुळे भीती निर्माण झाली असली तरी यातच एक आशेचा किरण समोर आला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. एलिझाबेथ स्नायडर (Elizabeth Schneider) असे या महिलेचे नाव असून तिने आपले अनुभव, या आजाराची लक्षणे या बद्दल एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये ती म्हणते की, योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना व्हायरस हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवू नका. लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि वैद्यकीय चाचण्या करुन घ्या. तसंच मी कोरोनातून पूर्णपणे बरी झाले असून आता माझ्या दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे, असेही तिने सांगितले आहे. एलिझाबेथ हिच्या पोस्टला आतापर्यंत जवळपास 3 हजारांहून अधिक प्रतिक्रीया आल्या असून 23000 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. (Coronavirus: वुहान मधील 100 वर्षीय वृद्धाने केली कोरोना व्हायरसवर मात)

पहा पोस्ट:

ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिंकताना-खोकताना नाका, तोंडावर रुमाल धरा, चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा, वैयक्तिक स्वच्छता पाळा, हात स्वच्छ ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.