Weight Loss Drink: एका महिन्यात कमी होईल वजन, दररोज सकाळी सेवन करा कढीपत्त्याचं ज्यूस

परंतु, कढीपत्त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कढीपत्याच्या पानांप्रमाणेचं त्याचं ज्यूस सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, तुम्ही कढीपत्त्याच्या सेवनाने वाढलेलं वजन कमी करू शकता. तुम्हालाही वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही आजपासून हा उपाय करू शकता.

Curry Juice (PC - Instagram)

Weight Loss Drink: कोणत्याही भाजीला कढीपत्ता (Curry Leaves) घातला की, त्या भाजीचा स्वाद वाढतो. परंतु, कढीपत्त्याच्या सेवनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कढीपत्याच्या पानांप्रमाणेचं त्याचं ज्यूस सेवन (Curry Juice) केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, तुम्ही कढीपत्त्याच्या सेवनाने वाढलेलं वजन कमी करू शकता. तुम्हालाही वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर, तुम्ही आजपासून हा उपाय करू शकता.

भारतात कोठेही कढीपत्ता सहज उपलब्ध होतो. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमि E असते. हे सर्व व्हिटॅमिन्स तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. कढीपत्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो शिवाय तुमचे केस आणि त्वचाही चांगली होते. (हेही वाचा - Monsoon Health Tips: पावसाळ्यात गवती चहा प्यायल्याने 'या' आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत)

 

View this post on Instagram

 

Curry leaves juice . This is my morning detox drink. Rich in iron and minerals perfect for post workout or early morning drink . 1. Curry leaves 2. Dates - 2 Grind it well with a glass of water. Filter it and add 2 to 3 drops lemon(you can add more lemon juice if you wish but tastes better with few drops) . .. #detoxdrink #detoxdrinks #morningdrink #curryleaves #curryleavesjuice #healthydrinks #healthyjuice #healthyjuices #livefit #livehealthier #livehealthy #healthyrecipies #herbaldrink #herbaljuice #healthylifestyles #healthylivingtips #dates #ironrichfoods #postworkoutdrink #foodphotography #instafood #foodstylist

A post shared by Berry Bites (@berrybites2020) on

कढीपत्याचं ज्यूस बनवण्यासाठी कढीपत्याची 5-10 पानं आणि एक ग्लास पाणी घ्या. हे पानं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. सकाळी उठल्यानंतर या ज्यूसचं सेवन करा. हे ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात. या ज्यूसचं सेवन केल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

 

View this post on Instagram

 

Curry leaves juice. . . . . . . . . . . #curryleaves #curryleavesjuice #instamood #instadaily #healthyfood #healthyeating #feed #feedyoursoul #feedfeed #instagood #instafam #healthylifestyle #foodblogfeed #foodphotography #foodporn #foodblogger #foodblogging .

A post shared by food_for_foodie (@missy_candycan) on

कढीपत्याचं ज्यूस तयार करताना त्यात पालक, ओवा, पुदिना किंवा जिरे टाका. त्यामुळे ज्यूसचा स्वाद वाढण्यास मदत होईल. रोज सकाळी कढीपत्याचं ज्यूस प्यायल्याने शरीरातील टॉक्‍सिन बाहेर पडण्यास मदत होते. या ज्यूसमुळे आपलं शरीर आतमधून स्वच्छ होतं. याशिवाय कढीपत्याच्या सेवनाने अपचनाची समस्या दूर होते.(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif