डोकेदुखीची समस्या उद्भवण्यामागे असू शकतात ही '5' कारणे !

पण ही समस्या उद्भवण्यामागे सामान्यपणे ही 5 कारणे असतात...

डोकेदुखी (Photo Credits: Pixabay)

आजकालच्या या धावपळीच्या जीवनशैलीत कौटुंबिक आणि ऑफिसचे टेन्शन प्रत्येकालाच असते. यामुळे तणाव, थकाव, चिंता यांसारख्या समस्या वाढतात. परिणामी डोकेदुखीची समस्या उद्भवते. या समस्येने अनेक लोक पीडित आहेत. पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

डोकेदुखीची समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. पण ही समस्या उद्भवण्यामागे सामान्यपणे ही 5 कारणे असतात...

तणाव

तणावाचे सर्वात पहिले लक्षण आहे डोकेदुखी. तणावग्रस्त असाल तर डोकेदुखी उद्भवेल. याशिवाय निराशा, झोप न झाल्याने किंवा थकव्यामुळे देखील डोके दुखू शकते.

औषधे

हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी घेत असलेल्या औषधांमुळेही डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेणे फायदेशीर ठरेल.

मायग्रेन

सतत डोके दुखणे हे मायग्रेनचे लक्षण असू शकते. मायग्रेनमुळे डोक्यात असह्य वेदना होतात. एकाच बाजूचे डोके दुखते. तर कधी दोन्ही बाजूचे डोकेदुखी लागते.

स्ट्रोक

स्ट्रोकमुळेही डोकेदुखी उद्भवू शकते. स्ट्रोकच्या सुरुवातीच्या काळात वेदना अतिशय तीव्र असतात. डोक्याच्या एका भागात रक्ताचा पुरवठा नीट होत नसल्यास मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि पेशी डॅमेज होवू लागतात.

ब्रेन फ्रिज

काही लोकांना कोल्ड ड्रिंक प्यायल्याने किंवा आईसक्रीम खाल्याने डोके दुखू लागते. यामध्ये अधिक थंड खाल्याने रक्तवाहीन्या प्रभावित होतात आणि डोकेदुखीची समस्या उद्बवते.