IPL Auction 2025 Live

दिलासादायक! बुस्टर डोस Omicron विरूद्ध लसीची प्रभावीता 88% पर्यंत वाढवू शकतो- UK Report

तिसरी लस किंवा बूस्टर डोस रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवतो

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) हाहाकार माजवत आहे. हा प्रकार अतिशय संसर्गजन्य असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणू लसीचा तिसरा डोस या व्हेरिएंटवर प्रभावी ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवली गेली होती. आता त्याबद्दल दिलासादायक बाब समोर आली आहे. लसीचा तिसरा डोस ओमायक्रॉन प्रकाराविरूद्ध 88 टक्क्यांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. ब्रिटनमधील एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

बूस्टर डोस लसीच्या दुसर्‍या डोसपेक्षा नवीन प्रकाराविरूद्ध उच्च पातळीचे संरक्षण प्रदान करतो, ज्याची प्रभावीता सहा महिन्यांच्या कालावधीनंतर (लसीचा तिसरा डोस) कमी होऊ लागते. युकेमध्ये Omicron चे पहिले प्रकरण आढळून आल्याने लसीचा बूस्टर डोस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकतेच लोकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोक असे आहेत ज्यांना बूस्टर डोस मिळालेला नाही.

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीचा अहवाल शेअर करत, या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये भर घालताना, डॉ एरिक टोपोल म्हणाले की, दुसरा डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉनविरुद्ध लसीची परिणामकारकता 6 महिन्यांनंतर 52 टक्क्यांपर्यंत कमी होते. तिसरी लस किंवा बूस्टर डोस रोगप्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवतो. हे संसर्गाच्या अशा गंभीर लक्षणांपासून देखील संरक्षण करते ज्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. (हेही वाचा: कोरोनानंतर इस्रायलमध्ये आढळला Florona नावाचा आजार; दोन व्हायरसचा संसर्ग, जाणून घ्या सविस्तर)

डॉक्टर एरिक टोपोल पुढे म्हणाले, 'ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रुग्णालयात दाखल होण्याचा धोका तिसऱ्या डोसमुळे बराच कमी होतो, कारण ते उत्तम संरक्षण प्रदान करते. तिसरा डोस घेतल्यानंतर, लसीची परिणामकारकता 52 टक्क्यांवरून 88 टक्क्यांपर्यंत वाढते. ज्यांना लसीचा एकही डोस मिळाला नाही त्यांच्या तुलनेत, तीनही डोस घेतलेल्या ओमायक्रॉन रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याच्या जोखमीत सरासरी 81 टक्के घट दिसून आली.