हिवाळ्यात तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

कारण या दिवसात तीळापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळाचा स्वाद जरी उत्तम असला तरीही त्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असून त्यामध्ये सेसमीन नावाचे अॅंन्टिऑक्सिडेंट असल्याचे सांगितले जाते.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

थंडीच्या दिवसात बहुतांश लोक घरी तीळ (Sesame Seeds) आणि गुळ असलेले पदार्थ बनवतात. कारण या दिवसात तीळापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळाचा स्वाद जरी उत्तम असला तरीही त्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असून त्यामध्ये सेसमीन नावाचे अॅंन्टिऑक्सिडेंट असल्याचे सांगितले जाते. हे अॅन्टिऑक्सिडेंट रोगांना दूर पळवण्याचे काम करते. एका संशोधनानुसार, तीळामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, मिनिरल्स, मॅग्नेशिअम, लह आणि कॉपर सह अन्य पोषक तत्व सुद्धा असतात. थंडीच्या दिवसात तीळाचे सेवन केल्याने बुद्धी वाढते असे मानले जाते. दरररोज तीळ खाल्ल्यास गोष्टी विसरण्याची सवय कमी होते.

तीळात काही असे तत्व आणि विटामिन्स असतात त्यामुळे झोप उत्तम लागते. त्याचसोबत ताण कमी करण्यास मदत होते. हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने नव्याने तयार होणाऱ्या हाडांना मजबूती येते आणि सांधे दुखीची समस्या सुद्धा कमी होते. त्यामुळेच तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे नेहमी सांगितले जाते. तीळात असलेले तेल हे उच्च रक्तदाब कमी करण्यास ही मदत करत असल्याने हृदयासंबंधित समस्या कमी होते. तीळ खाल्ल्याने 25 टक्के मॅग्नेशिअम आरोग्याला मिळते.(थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घ्या)

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास काळे तीळ फार उपयुक्त ठरतात. तसेच सेसामिन आणि सेसमोलिन नावाचे दोन पदार्श असून ते आरोग्यासाठी फार गुणकारी ठरतात. मात्र अतिप्रमाणात तीळाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने जळजळ आणि अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. तसेच हिवाळ्यामध्ये गुळाच्या चहा प्यायल्याने विविध फायदे होतात. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्याने हिवाळ्यात थंडीमुळे होणाऱ्या सर्दीपासून आपला बचाव होतो. तसेच गुळाचा चहा प्यायल्याने थंडी कमी वाजते.