मायग्रेन, पोटाचे विकार, खोकला यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरेल 'सफरचंद', अशा पद्धतीने करा सेवन

मात्र सफरचंद हे मायग्रेन सारख्या गंभीर आजारावर आणि अनेकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणा-या आजारावर गुणकारी ठरत हे ब-याच जणांना माहित नसेल. मात्र हे खाण्याची ठराविक पद्धत आहे.

Apple (Photo Credits: PixaBay)

निसर्गापासून बनलेली कोणतीही गोष्ट हे पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. त्याचा कधीही शरीरावर विपरित परिणाम होत नाही. त्यात फळांमधील सफरचंद हे फळ शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे. तशी सर्वच फळे औषधी तसेच शरीरासाठी गुणकारी आहेत. पण थंडीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे हे सफरचंद खाल्ल्याने न केवळ मायग्रेनचा तर पोटाचे विकार, खोकला यांसारख्या आजारांवरही फायदेशीर ठरु शकतो.

रोज एक सफरचंद खाणा-या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही असं बरेच डॉक्टरांचे म्हणणे असते. मात्र सफरचंद हे मायग्रेन सारख्या गंभीर आजारावर आणि अनेकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणा-या आजारावर गुणकारी ठरत हे ब-याच जणांना माहित नसेल. मात्र हे खाण्याची ठराविक पद्धत आहे.

पाहा कसे कराल सफरचंदाचे सेवन:

1) पोटाचे विकार असलेल्या लोकांनी नियमित एक सफरचंद खाल्ल्याने फायदा होतो. साल न काढता खाल्लेलं सफरचंद कफ कमी होण्यास मदत होते. सफरचंदातील फायबर कॉलेस्ट्रॉल कमी करतं.

2) कापलेलं सफरचंद रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवून आणि मग सकाळी हे सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्यास मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यावर फायदेशीर ठरतं.

हेदेखील वाचा- रिकामीपोटी खाऊ नका ही 5 फळे, शरीरावर होतील दुष्परिणाम

3) तुम्ही दिवसातून 2-3 सफरचंद खात असाल तर संपूर्ण दिवसभर तुमच्या शरीराला आवश्यक असलेला आयर्न या सफरचंदातून पुरवला जातो.

4) सफरचंदात आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणूनच कापून बराचवेळ ठेवल्यास ते काळं पडतं. ज्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं. त्यांनी रोज सफरचंदाचा ज्यूस प्यायल्यास जास्त फायदेशीर ठरतं.

5) खोकल्यावर सफरचंदाचं सेवन फायदेशीर ठरतं. सफरचंदाच्या ज्यूसमध्ये काळ्या मिरीची पावडर टाकून प्यायल्यास खोकल्यावर आराम मिळतो.

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही मायग्रेनसोबतच इतर अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता. फक्त ते खाताना वरील पद्धतीने त्याचे सेवन केल्यास शरीरावर त्याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही.