10th International Day of Yoga: यंदा 'स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास' या थीमवर साजरा होणार 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन; पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली श्रीनगरमध्ये पार पडणार मुख्य कार्यक्रम

‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास’, ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना असून, ती वैयक्तिक तंदुरुस्ती आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यामध्ये योगसाधनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देते.

PM Narendra Modi During Yoga Day. (Photo Credits: ANI)

यंदा 21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (10th International Day of Yoga), श्रीनगरमध्ये एसकेआयसीसी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांमधील 7,000 पेक्षा जास्त लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत श्रीनगर मधील दाल लेकच्या काठावर एकत्र येणार आहेत.

‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास’, ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना असून, ती वैयक्तिक तंदुरुस्ती आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यामध्ये योगसाधनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देते.

योगाभ्यासाद्वारे जागतिक आरोग्य आणि निरामयतेला प्रोत्साहन देण्याचा संदेश देत हजारो सहभागींना एकत्र आणण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी, पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामायिक योग प्रोटोकॉल सत्रात सहभागी होतील. सर्व योग प्रेमींसाठी योगदिनाचा हा मुख्य कार्यक्रम उत्कंठावर्धक अनुभव देणारा ठरावा यासाठी श्रीनगरमध्ये जोरात तयारी सुरू आहे.

योगाभ्यासाच्या फायद्यांची जास्तीत जास्त सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ग्रामप्रधानांना एक पत्र देखील लिहिले आहे. याआधी  2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाल्यापासून, पंतप्रधानांनी दिल्ली मध्ये कर्तव्य पथ, चंदीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, यासारख्या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून योग दिनाचा पुरस्कार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहयोगाने ‘योग फॉर स्पेस’ यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील 'संपूर्ण सरकार' दृष्टिकोनामध्ये विविध सरकारी विभागांनी परस्पर समन्वयाने केलेले प्रयत्न, तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचा सक्रीय सहभाग समाविष्ट आहे. राष्ट्रीय आयुष मिशन टीम संपूर्ण आरोग्यावरील योग साधनेचा प्रभाव दाखवून देण्यासाठी देशभर कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif