Google Doodle #Celebrating Pride: लैंगिक अभिव्यक्तीची 50 वर्षे पूर्ण करत गुगलने डूडलच्या माध्यमातून उलगडला LGBT चा इतिहास

Google Doodle Celebrates 50 Year Of Pride (Photo Credits: Google)

जून महिना हा अनेक देशांमध्ये प्राईड महिना (Pride Month) म्ह्णून साजरा केला जातो. यंदा गे (Gay) , लेस्बियन (Lesbian), ट्रान्सजेंडर (Transgender) या वर्गाला लैंगिक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन म्ह्णून गूगलतर्फे खास डूडल साकारण्यात आले आहे. नेट स्वाईनहार्ट (Nate Swineheart) याने हे हटके व्हिडीओ डुडल तयार केले असून यातून प्राईड महिन्याचे महत्व व LGBTQI+ चळवळीचा इतिहास मांडण्यात आला आहे. या डूडलमध्ये आपण 1969 पासून ते 2019 पर्यंतचा इतिहास पाहू शकता . प्राईड परेडला तब्बल 50 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क मधील क्रिस्टोफर स्ट्रीट वरून सुरवात झाली होती व आज या चळवळीने व्यापक रूप प्राप्त केले आहे हाच इतिहास मांडण्यासाठी हे गूगल डूडल साकारलं असल्याचे नेट याने म्हंटले आहे.

डूडलर नेट याने याबाबत माहिती सांगताना म्हंटले की, 1969 च्या  दरम्यान 'स्टोनवॉल इन' या न्यूयॉर्क मधील बार मध्ये पोलीस आणि LGBTQI+ वर्गातील काही जणांमध्ये काहीसा वाद झाला होता. त्याकाळी गुन्हा मानले जाणारे कृत्य केले म्हणून पोलिसांनी या वर्गावर हल्ला केला होता हा वाद वाढत जाऊन त्याने अक्षरशः एका दंगलीचे रूप घेतले होते या घटनेला विरोध करण्यासाठी त्या महिन्यात न्यू यॉर्क मध्ये सर्वाधिक  प्राईड परेड्सचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण झाल्याने हा इतिहास मांडण्याचे ठरवले, असे देखील नेट याने सांगितले. क्रिकेट विश्वचषक २०१९ Google Doodle: गूगल डूडल वरही क्रिकेट फिव्हर, लंडन मध्ये होणार Cricket World Cup ला आजपासून सुरूवात

गूगल डूडल (Watch Video)

जून महिन्याला प्राईड महिना म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या दोन राष्ट्रपतींनी पाठिंबा दर्शवला होता. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्विट करून याबाबत घोषणा केली आहे तसेच LGBTQI+ वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प ट्विट

भारतात देखील LGBTQI+ वर्गातील लोकांना मान्यता देण्यात आली आहे.दरवर्षी मुंबई पुणे सह अन्य महत्वाच्या शहरांमध्ये प्राईड परेडचे आयोजन केले जाते. या चवळीच्या मार्फत सर्वांनी कायदेशीर रित्या वैध मान्यता मिळालेल्या LGBTQI+ वर्गाला समाजात देखील मान्यता मिळावी असे प्रयत्न केले जात आहेत.