World's Most Expensive Biryani: जगातील सर्वात महागडी Gold Royal Biryani कुठे मिळते माहिती आहे का? जी सजवली जाते 23 कॅरेट सोन्याने
या बिर्यानीची किंमत (Biryani Cost) तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. ही जगातील सर्वात महागडी बिर्यानी असली तरी ती प्राधान्याने खाणारेही कमी नाहीत. दुबई येथील जगब्रसिद्ध रेस्टॉरंट गोल्ड ने ही बिर्यानी लॉन्च केली आहे.
बिर्यानी (Biryani) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती कशीही असली तरी बहुतांश लोक खाण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरही बिर्याणी चांगलीच ट्रेण्ड होत आहे. आज आम्ही आपल्याला अशाही एका बिर्यानीबद्दल सांगणार आहोत. जी आहे जगप्रसिद्ध. इतकेच नव्हे तर संपूर्ण जागातील सर्वात महागडी बिर्याणी (World's Most Expensive Biryani) असाही या बिर्यानीची ओळख आहे. जाणून घ्या गोल्ड रॉयल बिर्यानीची (Gold Royal Biryani Rate) किंमत, ती पानात वाढण्याची पद्धत, सजावट आणि ती कुठे मिळते यांविषयी सर्व काही.
कुठे मिळते?
आम्ही इथे ज्या बिर्यानीबद्दल सांगत आहोत ती बिर्यानी दुबई (Dubai) येथे मिळते. या बिर्यानीची किंमत (Biryani Cost) तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. ही जगातील सर्वात महागडी बिर्यानी असली तरी ती प्राधान्याने खाणारेही कमी नाहीत. दुबई येथील जगब्रसिद्ध रेस्टॉरंट गोल्ड ने ही बिर्यानी लॉन्च केली आहे. रॉयल बिरयानी (Gold Royal Biryani) असे या बिर्यानीचे नाव आहे.
किंमत किती?
एका रिपोर्टनुसार ही बरियाानी DIFC येथील Bombay Borough रेस्त्रांमध्ये मिळते. ही बिर्याणी जागातील एक महागडी बिर्यानी म्हणून ओळखली जाते. सांगितले जाते ही एक प्लेट बिर्यानी तब्बल 20000 रुपए (Biryani Rate) इतक्या किमतीला विकली जाते.
बिरयानीचे नाव काय?
या बिर्यानीचे वैशिष्ट्य सांगितले जाते की, या बिर्यानीला 23 कॅरेट सोन्याने (23 Carat Gold) सजवले जाते. बिरयानी (Biryani) चे नाव ठेवण्यात आले आहे. 'रॉयल गोल्ड बिरयानी' (Royal Gold Biryani).
या बिरयानीमध्ये कश्मीरी मटन कबाब, जुनी दिल्ली मटन चॉप्स, राजपूत चिकनचे कबाब, मुगलाई कोफ्ता आणि मलाई चिकन आदी गोष्टी या बिर्यानीत समाविष्ट असतात. बिरयानीसोबत रायता, करी आणि सॉस(Sauce) दिले जाते. रेस्टॉरंटकडून सांगण्यात येते की, रेस्टॉरंटमध्ये येऊन ऑर्डर दिल्यास बिर्यानी अवघ्या 45 मिनीटांमध्ये तयार असते.